शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

 

अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या ‘त्या’ 48 गावातील पीकांचेही होणार पंचनामे ; पुनर्वसन मंत्र्यांचे आदेश

बार्शी तालुक्यातील 4 मंडळातील 48 गावातील पंचनामे हे वगळण्यात आले होते. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते. पीकाचे नुकसान शिवाय मदतीसाठी या गावचे शेतकरी हे पात्र झाले नसते. परंतू या 4 मंडळातील 48 गावातील पंचनामे करुन घेण्याचे आदेश पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.


गाळप हंगाम सुरु होताच ऊस वाहतूकदार, मुकादमांचा कोयता बंद मेळावा

ऊस वाहतूकदार आणि मुकादमाच्या अडचणी सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच  आज(शनिवारी) या दोन्ही घटकांचे प्रश्न घेऊन सांगली येथे ऊसतोड मुकादम आणि वाहतूकदारांचा कोयता बंद मेळावा घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जनविकास ऊसतोड मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरिदास लेंगरे यांनी दिली.


मनसेचा ‘काळा दसरा’ ; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन

सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली असून केवळ शेतकऱ्यां प्रतीच नाही तर सर्वच मुद्यांवर सरकार हे अपयशी ठरले असल्याचा आरोप मनसेच्यावतीने करण्याात आला आहे. शेतकऱ्यांचे विविध मुद्दे घेऊन काल (शुक्रवारी) पुणे येथे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी रावणरुपी आघाडी सरकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.


सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढ

पुणे: केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेच्या मापदंडात चांगले बदल केले आहेत. ठिबक व तुषार संचासाठी खर्चमर्यादांमध्ये १० ते १३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे अनुदानदेखील वाढून मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.


पोकरा’च्या अंमलबजावणीत अकोट उपविभाग पिछाडीवर

अकोला:जिल्ह्याच्या कृषी खात्यात पूर्णवेळ अधिकारी नसल्याचा फटका कृषी विभागाच्या विविध योजनांना कसा बसत आहे. यावर पुन्हा एकदा पोकरा प्रकल्पाच्या प्रगती निर्देशाकांने शिक्कामोर्तब केले. अकोट हा उपविभाग पोकरा योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात थेट ३२ व्या स्थानावर घसरला आहे.


आनंदवार्ता …! दिवाळीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरु होणार ; पणन महासंघाची घोषणा

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. येणारी दिवाळी ही कापूस उत्पादकांसाठी आनंद घेऊन येणारी आहे. कारण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदी सुरु होणार आहे अशी घोषणा पणन महासंघाने केली आहे. पणन महासंघाच्या असलेल्या 50 केंद्रांवर तसेच सीसीआयच्या 74 केंद्रांवर कापूस खरेदी प्रक्रिया केली जाणार आहे. विशेष म्हणजे चांगल्या दर्जाच्या कापसाला ६ हजार 25 असा हमी भाव मिळणार आहे.


विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता.१४) महाराष्ट्रातून निरोप घेतला आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आज (ता. १६) विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email