शेती विषयक बातम्या- 17 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 17 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 17 ऑक्टोबर

सोयबीनचे दर घटूनही का वाढत आहे आवक ? सोयाबीनच्या दराचा भरवासाच राहिला नाही

मध्यंतरी आठ दिवसासाठी दर स्थिर राहिले होते पण पुन्हा घसरण ही कायम आहे. आता चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 5100 तर सर्वसाधारण 4800 चा दर मिळत आहे. दर घटूनही आवक मात्र वाढत आहे. भविष्यातील दराबाबतही शेतकऱ्यांना आता आशा राहिलेली नसल्यानेच मिळेल त्या दरात सोयाबीनची विक्री केली जात आहे.


कापूस उत्पादकांना अधिकच्या दराची संधी, दिवाळी पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

कापसामधून जर अधिकचे उत्पादन हवे असेल तर शेतकऱ्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि तरच पांढऱ्या सोन्याला अधिकचा आणि हमी दर मिळणार आहे. कारण कापूस पणन महासंघाची खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यावर राज्यातील शेतकऱ्यांच्या लक्ष लागले होते ते खरेदी केंद्राकडे. आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


एकात्मिक शेतीमध्ये उत्पादनात वाढ अन् शेतकऱ्यांचाही फायदा

शेती व्यवसयात काळाच्या ओघात अमूलाग्र बदल होत आहे. उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक पर्याय हे खुले केले जात आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा आता तोट्याचा राहिला नसून ज्या शेतकऱ्यांनी अत्याधुनिकतेची कास धरली आहे त्यांच्या उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास झालेला आहे.


मोदी सरकारने शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला, खतांवर सबसिडी वाढवली

मोदी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. खतांच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत प्रचंड वाढ झाल्यानंतर त्याच्या किंमतीही वाढतील अशी अपेक्षा होती. पण आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने यावर्षी फॉस्फेट आणि पोटॅश खतांच्या किंमती न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देताना या दोघांवरही सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


उमराणे कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याला क्विंटल मागे मिळाला 5151 रुपयांचा भाव

उमराणे( जि. नासिक) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याचे लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उमराणे येथील शेतकरी रणजीत देवरे यांनी आणलेल्या कांद्याला मुहूर्ताचा भाव हा सर्वोच्च पाच हजार 151 रुपये मिळाला.


विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १७) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारादेखील हवामान विभागाने वर्तविला आहे.


‘डीएपी’ महागणार नाही

पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक कंपन्यांना साडेसहा हजार कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘डीएपी’सह इतर रासायनिक खतांचा सुरळीत व किफायतशीर दरात पुरवठा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email