शेती विषयक बातम्या-27 संप्टेंबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या-27 संप्टेंबर

 

उभा कापूस आडवा, सोयाबीनला कोंब फुटले ; शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे

उस्माबाद, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. राज्यात सोयाबीनची पेरणी ही 53 लाख हेक्टरावर झालेली होती. पावसाचा फटका मराठवाड्यातील 14 लाख हेक्टरावरील पिकांना बसला असून तसा अहवालही विभागीय कार्यालयात सादर करण्यात आला आहे. मात्र, आता पंचनाम्याचा घाट न घालता थेट मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.


 

यंदा पेरणी दुबार, पंचनामेही दुबार अन् पाऊस सरासरी पार

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पण त्यानंतरही पाऊस हा सुरुच असल्याने अतिरक्त भागातील नुकसानीचे पंचनामे हे पुन्हा करण्याची नामुष्की ही प्रशासनावर ओढावणार आहे.


 

शेतकऱ्यांच्या हीतासाठी साखर आयुक्तालयाची शक्कल, मानांकनातून समोर येणार कारखान्याचा कारभार

एफ.आर.पी रक्कम ही एकरकमी मिळावी याकरिता शेतकऱ्यांची आंदोलने होत आहेत. मात्र, अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये किंवा कारखान्याचा कारभार कसा आहे याची माहिती थेट शेतकऱ्यांना मिळावी याकरिता गाळप आणि सबंध कारखान्याचा कारभार पाहून कारखान्याला कृषी आयुक्तालयाकडून मानांकन दिले जाणार आहे.


 

आधी कोरोना, मग अतिवृष्टी अन् आता करपा रोग…! नुकसान सहन होत नसल्याने शेतकऱ्याने कापली केळीची दीड हजार झाडे

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील केळी उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट येत असून जणू संकटाची मालिकाच सुरू आहे. अगोदरच अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यातच आता नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळीवरही करपा रोग आल्यामुळे केळीचा भाव मातीमोल झाला आहे. त्यामुळे केळीचे लाखोंचे नुकसान होणार आहे. हे नुकसान सहन होत नसल्याने देळूब ( बु.) येथील एका तरूण शेतकऱ्याने शेतातील दीड हजार केळीची उभी झाडे कापून टाकत आपला संताप व्यक्त केला आहे.


 

ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा घाट

पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा लाभलेल्या ठिबक अनुदान वाटपाचे कामकाज पारदर्शक होण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन कागदपत्रे पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र अधिकारी आता पुन्हा कागदपत्रे घेऊन कार्यालयात ‘भेटायला’ बोलवत असल्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहे.


 

ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम अन्यायकारक : भाजप

अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील वीजकपात करण्याचा तसेच पथदिवे बंद करणे, पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्याचे सत्र शासनाने सुरू केले आहे. अधिकाऱ्यांना उद्दिष्ट देऊन वसुलीसाठी कारवाई करू, अशी धमकी देण्यात आली आहे.


 

गतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर पूर्ण करावेत: जयंत पाटील        

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी जिल्ह्यातील प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पांची कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले.

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email