शेती विषयक बातम्या- 18 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 18 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 18 ऑक्टोबर

 

नंदुरबारमध्ये पपई बागांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरुच, परतीच्या पावसाचा कांद्यालाही फटका

अतिवृष्टी आणि संततधार पावसाचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असून मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन पपई चे फळे उघडी पडून खराब होत आहेत.


लखीमपूर खेरी प्रकरणी शेतकरी आक्रमक, रेल्वे कुठं थांबवायची हे आम्हाला माहिती, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची आणि अटक करण्याची मागणी करत मोर्चाने रविवारी रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा केली होती.


जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी ऊसदर आंदोलनाचं रणशिंग फुंकणार

जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानात ऊस परिषद होणार असून राजू शेट्टी ऊसदर, एकरकमी एफआरपी आणि पूरग्रस्तांच्या मदतीवरुन कोणती भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.


एकरकमी FRP साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, सांगलीच्या साखर कारखान्यांवर मोटार सायकल रॅली

उसाला एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे. वजनातील काटा मारी बंद झाली पाहिजे. तोडीला मोजाव्या लागणाऱ्या पैशाची पद्धत बंद झाली पाहिजे आणि महापुरात बुडालेला ऊस प्राधान्याने तोडला पाहिजे. या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे


विदर्भ,मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ… अनेक ठिकाणी सोयाबीनचे नुकसान

गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाला आहे. मान्सून उत्तर पावसाचा मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, विदर्भातील, बुलढाणा, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने खरिपातील पिकांचे नुकसान यात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालेत. अचानक आलेल्या पावसामुळे काढणी केलेला सोयाबीन पाण्यात वाहून गेल्याच्या घटना देखील राज्यात पुढे आल्या आहेत.


संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखल

संत्र्याच्या बागा उभ्या राहत असून, संत्रा झाडांची छाटणी करण्यासाठी अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अत्याधुनिक यंत्र उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाच्या फळशास्त्र विभागामार्फत या यंत्राची हाताळणी केली जाणार आहे.


 झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळख

जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे. गावशिवारात सुमारे ४० वर्षांपासून झेंडू व अन्य फुलांची शेती केली जाते. फुलांचे मुख्य पुरवठादार गाव म्हणून शिरसोलीने ओळख मिळविली आहे. दसरा, दिवाळी सणाला इथल्या फुलांना जिल्ह्यासह परराज्यांतही मागणी असते.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email