शेती विषयक बातम्या- 19 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 19 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 19 ऑक्टोबर

youtube

हमीभाव केंद्रकाडे कोण फिरकणार ? बाजारात ‘पांढऱ्या सोनाल्या’ला अधिकचा दर

सध्या कापसाला 7 हजार रुपये क्विंटलचा दर हा बाजारात मिळत आहे तर हमीभाव केंद्राचा दर हा 6025 एवढा ठरवून देण्यात आलेला आहे. असे असले तरी संचालकांच्या बैठकीत खरेदी संदर्भातला ठराव घेऊन तो शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राचा निर्णय घेण्याचा अधिकार आता राज्य सरकारला देण्यात आला आहे.


शेतकऱ्यांचे तर्क-वितर्क ; मात्र, अद्यापही विमा नुकसान भरपाईचे घोडे अडलेलेच ; काय आहे वास्तव ?

अनुदान मंजूर करण्यात आले तर लागलीच नुकसानभरपाई द्यावी लागणार यामुळे विमा कंपन्या ह्या पुढची प्रक्रियाच करीत नाहीत. गावात, चावडी-चावडीवर नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांचे तर्क-वितर्क सुरु आहेत. मात्र, नुकसानभरपाईसाठी नेमण्यात आलेल्या सहा विमाकंपनीमध्येच एकवाक्यता नसल्याने मदतीसाठी शेतकऱ्यांना अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार हे सांगता येत नाही.


हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरले

शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने तत्परता दाखविलेली असताना काही नफेखोर विमा कंपन्यांनी मात्र केंद्र व राज्य सरकारला वेठीस धरले आहे.


ओल्या दुष्काळाची घोषणा करा

विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत संततधार पाऊस, अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांची काढणीला आलेली सोयाबीन, ज्वारी, कपाशीची पिके हातातून गेली आहेत. याआधीही हंगामात नुकसान झालेले आहे.


हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा निर्णय घेतल्याने सीसीआयकरीता सब एजंट म्हणून खरेदी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.


नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडी

नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली खरी, मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही ऐन काढणीच्या काळात सोयाबीनला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे बहुतांश भागातील सोयाबीनच्या शेतात पाणी साचलेले आहे.


सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या पाठीशी : पाटील

सोलापूर: ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र कारखानदारीवर अवलंबून आहे. त्यामुळे राज्यातील कुठलाही साखर कारखाना बंद राहता कामा नये, ही राज्य शासनाची भूमिका आहे’’, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email