शेती विषयक बातम्या- 20 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 20 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 20 ऑक्टोबर

विमा अर्जांचे गठ्ठे थेट ऊसाच्या फडात, मदत मिळणार तरी कशी ?

नांदेडमध्ये अनोखाच प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडे भरुन दिलेले अर्ज थेट ऊसाच्या फडात आढळून आले आहेत. त्यामुळे विमा रक्कम देण्याची विमा कंपनीची किती मानसिकता आहे हे लक्षात येते. एक नव्हे…दोन नव्हे तर तब्बल 500 अर्ज हे ऊसाच्या फडात सापडले आहेत.

हुश्श…! अखेर सणासुदीत का होईना खाद्यतेलाचे दर घटणार ; दिवाळी होणार गोड होणार

महागाई आणि दिवसेंदिवस वाढत असलेले दर यामुळे मुलभूत गरजांचा पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे यंदाची दिवाळी गोड होणार आहे. (Reduced import duty on edible oil) खाद्यतेलावरील आयातशुल्क हे कमी करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेले आहेत.

पावसाची उघडीप राहणार

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी राज्यात पाऊस उघडीप दिली असून, आज (ता. २०) मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची मोहीम

राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढविण्याकरिता ३८ कोटी रुपयांचे अनुदानित बियाणे वाटण्यासाठी कृषी विभागाने मोहिमेला सुरुवात केली आहे.

पहिली उचल ३३०० द्यावी: राजू शेट्टी यांची मागणी

कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३०० रुपये प्रति टन द्यावेत, पहिल्या टप्प्यात विनाकपात एकरकमी ‘एफआरपी’ अदा करावी. तसेच उर्वरित रक्कम जानेवारीपर्यंत न दिल्यास जानेवारीनंतर सुरू हंगाम बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.

कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३ नोव्हेंबरपासून फेऱ्या

पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाच्या चार फेऱ्या होत असून, १३ नोव्हेंबरला पहिली फेरी होईल.

आठ कारखान्यांना सांगलीतील गाळप परवाना

सांगली जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला होता. यंदाही १५ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज दाखल केला असून, त्यापैकी आठ कारखान्यांना आजअखेर परवाना मिळाला आहे; तर सात कारखान्यांचे परवाने विविध कारणामुळे प्रलंबित आहेत.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email