शेती विषयक बातम्या- 21 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 21 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 21 ऑक्टोबर

दुष्काळात तेरावा : शॉर्टसर्किटने 10 एकरातील ऊसाचा फड जळून खाक ; लाखोंचे नुकसान

डवणी तालुक्यातील काडीवडगाव येथे शॉर्टसर्किटमुळे 10 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या 10 एकराच्या क्षेत्रावर तीन शेतकऱ्यांचा ऊस होता. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे

अतिवृष्टीने फेरले स्वप्नांवर पाणी… कशी करावी लेकीची पाठवणी?

पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आपल्या मुलीचे कन्यादान सुध्दा करता आलेले नाही. ही अतिशोक्ती वाटेल पण हा प्रकार घडला आहे. (Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्यातील विहममांडवा येथे. घरात आठराविश्व दारिद्र त्यात अतिवृष्टीचा अवकृपा त्यामुळे सर्वकाही मातीमोल झालं आहे. त्यामुळे मुलाीचे लग्न करण्यासाठीही त्यांच्या काही उरलेले नाही. या नैसर्गिक संकटामुळे मुलीची पाठवणी तरी करावी कशी असा प्रश्न त्या शेतकऱ्यासमोर होता.

कापूस विका पण गरजेपुरता अन् उरलेल्या कापसाचे ‘सोनं’ करा, शेतकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला

कापसाची तोडणी ही अंतिम टप्प्यात आहे. तोडणी झाली की शेतकऱ्यांना वेध लागतात ते विक्रीचे. मात्र, ज्या पिकाला अधिकचा दर आहे त्या पिकाची विक्री करताना किमान बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण यंदा कापसाचे उत्पादनच हे मुळात कमी झालेले आहेय त्यात पावसाने उत्पादनावर आणि पिकावर परिणाम झालेला आहे. अशा परस्थितीमध्ये भविष्यात काय दर राहतील याचा अभ्यास करणेही तेवढेच महत्वाचे आहे

निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधार

पुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे निर्यात कमी होती. मात्र सध्या सोयापेंड आयात व निर्यातीचे दर हे ४१ हजार रुपये प्रतिटनांच्या जवळपास आहेत. त्यामुळे निर्यात पडतळ (पॅरिटी) निर्माण झाली असून बाजारात सोयाबीनच्या पाच हजार रुपये दराला आधार निर्माण झाला आहे.

राज्याच्या तापमानात चढ-उतार

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात चढ- उतार सुरू आहेत. स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली असली तरी किमान तापमानात मात्र हळूहळू घट होत आहे. आज राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसा

राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी रुपयांचा शेतकरीवाटा हडप झाला होता. त्याची बंद पडलेली चौकशी आता पुन्हा सुरू झाली आहे. राज्याच्या लोकलेखा समितीने या प्रकरणाचा अहवाल मागविल्याने गैरव्यवहाराची रक्कम सात दिवसांत भरण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत.

बटाटा वाणाचे भाव तेजीत

बाजार समितीच्या आवारात मराठवाडा भागातील शेतकऱ्यांची बटाटा वाण खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. त्यातच पंजाब राज्यातून बटाटा वाणाची पुरेशा प्रमाणात आवक होत नाही. त्यामुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून बटाटा वाणाच्या भावात प्रति क्विंटलमागे एक हजार १०० रुपयांची वाढ झाली.

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email