शेती विषयक बातम्या- 22 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 22 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 22 ऑक्टोबर

पाऊस गेला गावाला, आता लागा कामाला
आता पाऊस संपला असून शेतकऱ्यांनी खरीपातील रखडलेली कामे आटोपून रब्बीच्या तयारीला लागण्याचा सल्ला हवामानतज्ञ डख यांनी दिला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष: सोयाबीनच्या उत्पादनात घट झालीच आहे. शिवाय पावसात भिजल्याने सोयाबीन हे डागाळलेले आहे

कशामुळे होतेय मोसंबीची फळगळती ?
ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत फळगळीचे प्रमाण वाढलेले आहे. रसशोषक पतंग, फळमाशी, बुरशी यामुळे फळगळ सुरु आहे. फायटोप्थाोरा बुरशीमुळेच मोसंबी आणि लिंबुवर्गीय फळपिकांमध्ये डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणार आहे. पण ऐन फळलागवडीच्या दरम्यानच रोगराईचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

‘ई-पीक पाहणी’ न केल्यास काय होणार ? मुदतीमध्ये आणखीन वाढ
आता नोंदणी केलीच नाही तर शेतकऱ्यांचे काय नुकसान होणार का असा सवाल ग्रामीण भागात विचारला जात आहे. शिवाय सध्या रब्बी हंगामाला सुरवात होत असून या हंगामातील पीकांच्या नोंदीही होण्याच्या दृष्टीने ई-पीक पाहणीची मुदत वाढवण्यात आली आहे

पहिली उचल ३३०० द्यावी : राजू शेट्टी यांची मागणी
यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३०० रुपये प्रति टन द्यावेत, पहिल्या टप्प्यात विनाकपात एकरकमी ‘एफआरपी’ अदा करावी. तसेच उर्वरित रक्कम जानेवारीपर्यंत न दिल्यास जानेवारीनंतर सुरू हंगाम बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.

कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सा कांद्याच्या व्यापाऱ्यांवर 13 ठिकाणी अचानक छापे टाकण्यात आले. या आयकर विभागाच्या छापामुळे कांदा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

बुलढाण्याच्या पेरू उत्पादनाला मिळणार चालना, होईल वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजनेचा फायदा
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा भाग म्हणून केंद्र सरकारची वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट एक शेतकऱ्यांसाठी असलेली योजना आहे

मंदिरे उघडली सणासुदीच्या काळात बाजार फुलला,दसऱ्याच्या निमित्ताने का होईना झेंडूला उच्चांकी भाव
निसर्गाच्या चढ-उतारामुळे अजूनही खरीप हंगाम पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे.खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो मात्र पावसाने जोरात हजेरी लावल्याने शेतकरी आपली निराशा व्यक्त करत आहेत.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व