शेती विषयक बातम्या- 23 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 23 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 23 ऑक्टोबर

 

जनावरांच्या गोठ्यातूनच होतो लंम्पी आजार, प्रतिबंधात्मक उपायोजनेमुळे प्रादुर्भाव कमी
जिल्ह्यात जनावरामध्ये लंम्पी आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. या संसर्गजन्य आजारामुळे कमी कालावधीत अधिक जनावरांना याची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात लासिकरणाला सुरवात करण्यात आली होती आता पर्यंत जिल्ह्यात दोन लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. लंम्पी हा जनावरांना होणारा त्वचा रोग असून तो संसर्गजन्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेतली तर या आजाराची लागणच होणार नाही.

पोषक वातावरणामुळे रब्बीचा ‘राजा’ हरभराच, विक्रमी लागवड होणार
पोषक वातावरणाबरोबर कृषी विभगाचेही नियोजन शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे. यंदाही शेतकऱ्यांचा बर हा हरबरा पिकावरच आहे.अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुमारे पावणेचार लाख हेक्टरपर्यंत हरभऱ्याची लागवड अपेक्षित धरली जात आहे. मराठवाड्यातही ज्वारीच्या उत्पादनात घट होऊन हरभऱ्याचे उत्पादन वाढणार आहे.

कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा
कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केली.

दुष्काळात तेरावा : रब्बीच्या तोंडावर वाढले खतांचे दर, शेतकरी दुहेरी संकटात
पेरणीला महागडे खत, मशागतीवर अमाप खर्च आणि शेती मालाला कवडीमोल दर यामध्येच शेतकरी मेटाकूटीला येत आहे. खरीपात एकाही पीकाला चांगला दर मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. असे असतानाही त्याने रब्बीची तयारी सुरु केली होती मात्र, आता रासायनिक खतांच्या दरात वाढ झाली आहे.

पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन उचलेना
शेतकरी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्याकडून फोन उचलला जात नाही. उचलला तर केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठ
सांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र या सूर्यवंशी बंधूंनी सात ते आठ वर्षांचे सातत्य ठेवत ऑयस्टर मशरूम (अळिंबी) व्यवसाय यशस्वी केला आहे. दर्जेदार उत्पादन घेत ‘सूर्यवंशी मशरूम’ या ब्रॅंडने मुंबई येथील तारांकित होटेल्सचे मार्केट त्यांनी मिळवले आहे.

अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधार
सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला असून, कांदा आणि टोमॅटोने या चर्चांना फोडणी दिली, असे म्हणावे लागेल. मात्र या चर्चांमध्ये सरकारच्याच आकड्यांकडे सोईस्कर डोळेझाक केली गेली. सध्याची भाववाढ रिझर्व्ह बॅंकेने अर्थव्यवस्थेसाठी आदर्श मानलेल्या वाढीच्या तुलनेत कमी असतानाही अर्धवट माहितीचा आधार घेऊन चुकीचे चित्र निर्माण केले गेले. अन्नधान्य, कांदा आणि टोमॅटोमधील भाववाढ फारच कमी किंवा उणे असल्याचे, सरकारच्या आकड्यांवरून स्पष्ट झाले.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email