शेती विषयक बातम्या- 24 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 24 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 24 ऑक्टोबर

 

यंदा कापसाचे दर तेजीतच
घटत्या उत्पादनामुळेच कापसाचे दर यंदा तेजीत राहणार आहेत. सध्या कापसाला 7 ते 8 हजार प्रतिक्विंटल दर मिळत आहे. जुनागड कृषी विद्यापीठाच्या अंदाजानुसार जागतिक पातळीवरही कापसाला यंदा मागणी राहणार आहे. त्यामुळे सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी कापसाच्या उत्पादनातून ती कसर भरुन काढता येणार आहे.

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखद धक्का, नाही भासणार खतांचा तुटवडा
खरीप हंगामातील नुकसान बाजूला सारत बळीराजा पुन्हा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. पूर्वमशागतीची कामे सुरु असून शेतकऱ्यांनाही अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये खतांचा तुटवडी भासू नये म्हणून कृषी विभागही सरसावलेला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यासाठी 2 लाख 95 हजार टनाचा खताचा पुरवठा केला जाणार आहे.

रब्बीसाठी मिळणार नव्या वाणाचे अनुदानीत हरभरा बियाणे
शासनाकडून अनुदान तत्वावर देण्यात येणाऱ्या बियाणांमध्ये काही गैर नसु नये याकरिता सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. आता कृषी आयुक्त कार्यालयाकडून एक नवाच नियम जारी करण्यात आलेला आहे. येथून पुढे 10 वर्षाखालील हरभऱ्याच्या बियाणाला अनुदान दिले जाणार नाही. तर हेच अनुदान नव्या वाणाच्या बियाणांना देण्यात येणार आहे.

आता नाही मजुरांची चिंता, 8 तासात 80 किलो कापसाची होणार वेचणी
पावसाने नुकसान त्यात एकरी 5 हजाराचा काढणी खर्च त्यामुळे सोयाबीन हे अद्यापही शेतातच आहे. पण कापूस वेचणीसाठी अद्यावत यंत्र आले आहे. ज्याच्या माध्यमातून शेतकरी स्वता: 8 तासामध्ये चक्क 80 किलो कापसाची वेचणी करु शकणार आहे. त्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे आणि मजुरांवरही खर्च होणार नाही.

कापसामध्येही सावकारकी ! तोंडी सौदे करुन शेतकऱ्यांची होतेय लूट
शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैशाची आवश्यकता होती. या बदल्यात येथील व्यापाऱ्यांनी कापसाचे पूर्वीच सौदे केले तेही 2500 ते 3000 हजार रुपयांनी. व्यापाऱ्यांनी सौद्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैसेही देऊ केले होते पण आता कापसाचे दर वाढले असूनही त्याच सौद्यानुसार कापसाची खरेदी करणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

लोकसहभागातून आता ‘ई-पीक पाहणी’चा उपक्रम, कृषी विद्यापीठातील विद्यार्थीही बांधावर
आता 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदतावाढ करण्यात आली असून अधिक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांनाच या विषयी मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांच्या पीकांची नोंद अॅपमध्ये करण्याचा अभिनव उपक्रम बुलढाणा कृषी महाविद्यालयाने घेतला आहे.

दिवाळीपर्यंत कांद्याचे भावा तेजीत राहणार,दिल्लीपर्यंत लासलगावचा कांदा
बाजारात फक्त कांद्याचे दर नाही तर भाज्यांचे दर सुद्धा शिगेला पोहचले आहेत. ठोक बाजारात भाज्यांचे दर नियंत्रणात आहेत पण किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत.मागील काही दिवसात हवामानात बदल आणि मोठ्या पाऊसामुळे भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळे आता दर वाढले आहेत. सध्या सणासुदीचा सिजन चालू आहे त्यामुळे दर असेच राहतील असा अंदाज व्यक्त केला आहे. यावेळी बाजारात कांद्याला मोठी मागणी आहे मात्र पुरवठा कमी असल्याने दर वाढले आहेत

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email