शेती विषयक बातम्या-28 संप्टेंबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या-28 संप्टेंबर

 

गुलाब’चं धुमशान, 5 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट

गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab cyclone ) मराठवाडा (Marathwada rain) आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं (Rain in Maharashtra) धुमशान पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात कालपासून तुफान पाऊस बरसत आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याचा प्रभाव पुढील 48 तास राज्यावर पाहायला मिळणार आहे. इकडे मुंबईसह ठाणे आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे.


शेतकऱ्यांसाठी नवी 35 पिके, पंतप्रधान मोदींनी दिला उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांना ‘कानमंत्र’

शेतकऱ्यांच्या हीतासाठी हे सरकार काम करीत आहे. अगदी तळागळातील शेतकऱ्याला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सरकारच्यावतीने केला जात आहे. त्या अनुशंगाने सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणी मध्यस्थी राहणार नसल्याचे (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याच्या सुधारीत बियाणे शेतकऱ्यांना दिले जात आहे. आता नव्याने पिकाचे 35 प्रकार हे शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे मंगळवारी सांगितले. यामधून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक वेगळी भेट असून सर्वसामान्य शेतकऱ्यालाही याचा फायदा होणार आहे.


अखेर त्या 44 साखर कारखान्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांनो आता ‘ही’ यादी पाहूनच ऊस घाला

ऊसाचा गळीत (Sugar Factory) हंगाम सुरु होण्यापूर्वी साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. एफआरपी रकमेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. मात्र, हे एफआरपी रक्कम थकीत किंवा कोणत्या साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते हे अद्यापही समोर आले नव्हते पण (Farmer) शेतकऱ्यांची फसणूक करणाऱ्या साखर कारखान्यांची यादीच साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कारखान्याचा व्यवहार कसा आहे याची माहिती होणार असून कोणत्या कारखान्यावर ऊस घालायचा याची जबाबदारी शेतकऱ्यावरच राहणार आहे.


‘जलयुक्त’ चे पाणी कुठे मुरले ? ‘एसीबी’कडून खुल्या चौकशीला सुरवात

जलयुक्त (Jalyukt Shiwar) ही युती (BJP Government) सरकारच्या काळातील एक महत्वपूर्ण योजना होती. शिवारीतील पाणी शिवाराच मुरावे हा त्यामागचा शुध्द हेतू होता. मात्र, स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि कृषी विभागातली अधिकारी यामुळे नेमके कुठे पाणी मुरले हे समोर आले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील या महत्वपूर्ण योजनेची आता ‘एसीबी’ कडून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारकडूल देण्याच आले आहेत. शिवाय चौकशीही सुरु झाल्याचे सांगण्यात आले आहे.


सहा दिवसांमध्ये 6 लाख हेक्टराने वाढले नुकसानीचे क्षेत्र, पावसाचा कहर सुरुच

खरीपातून (Kharif Hangam) उत्पादन पदरी पडेल ही आशाच मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांनी सोडून दिलेली आहे. आता केवळ नुकसानीचे आकडेवारी आणि मदतीबाबत सरकारची भुमिका एवढाच खरीपाचा विषय चर्चेचा राहिलेला आहे. सहा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील 14 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिलेला होता


सोलापूर : शेंगासह सोयाबीन पाण्यात, सांगा शेती करायची कशी?

काढणी कामे रखडलेली असून खरीपातील उत्पादनात यंदा मोठी घट होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. एकरी 20 हजार रुपये खर्च सोयाबीन आला असून शेतकऱ्यांची मेहनत ही वेगळीच. आता गुडघ्याभर पाण्यात सोयाबीन आहे आणि त्याच्या शेंगा सडून जात आहे. त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.


कृषी कायद्यांना ठाम विरोध

नवी दिल्ली : तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर १० महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चातर्फे सोमवारी (ता. २७) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला उत्तर भारतात जोरदार, तर उर्वरित राज्यांत संमिश्र प्रतिसाद मिळाला. राजधानी दिल्लीसह पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, राजस्थान, केरळ, तमिळनाडू आदी राज्यांत बंदचा अतिशय व्यापक प्रभाव दिसला.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email