शेती विषयक बातम्या-29 संप्टेंबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या-29 संप्टेंबर

 

गुलाब चक्रीवादाळामुळे खरीपाची आशा मावळली, मराठवाड्यात 182 मंडळात अतिवृष्टीने पीकांचे नुकसान

चक्रीवादाळामुळे कमी निर्माण झालेल्या परस्थितीचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. महिन्याभरापासून मराठवाड्यात पावसाचे थैमान आहे पण गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे आठ जिल्ह्यातील तब्बल 182 मंडळातील पिकांचे नुकसान झाले आहेत. खरीपातील सर्वच पिके आडवी झाली आहेत तर जनजीवनही विस्कळीत झाल्याचे चित्र उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. दोन दिवसांमध्ये मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.


पावसाची उसंत आता पंचनाम्यावर जोर, प्रशासन लागले कामाला

मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. शिवाय लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात आठ दिवसांमधून आज (बुधवारी) सुर्यदर्शनही झाले होते. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. आता जिल्हाधिकारी यांच्याकडून अतिवृष्टीचा अहवाल मागून घेतला जाणार आहे तर पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत.


केंद्र सरकारकडून पिकांच्या नव्या 35 वाणांचं लोकार्पण, कृषी कायद्यांवर मोदी सरकारची भूमिका काय?

केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी अजेंडा काय? आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अजेंडा नेमका काय आहे. केंद्र सरकारला शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करायचं आहे काय? सरकारला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जावेत असं वाटतंय का? आंदोलक शेतकऱ्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवण्याचा विचार आहे काय? याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिकांच्या 35 वाणांचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या दूर करणार असल्याचं म्हटलं.


अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 70 टक्के सोयाबीन मातीत.. लातूर, औरंगाबादेत सर्वाधिक नुकसान

गुलाब चक्रिवादळामुळे मराठवाड्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. शेतकऱ्यांचं तर हाता-तोंडाशी आलेलं पिक डोळ्यादेखत वाहून गेलं. ग्रामीण भागातील अनेक शेतात गुडघाभर पाणी साचलेलं असल्यानं एवढे खरीपाची संपूर्ण मेहनत आणि खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचेही तितकेच नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील एकूण क्षेत्रापैकी सुमारे 70 टक्के सोयाबीन मातीमोल झाल्याची माहिती हाती येत आहे.


केंद्र सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान : कृषिमंत्री दादा भुसे

सध्या सोयाबीनची आवक, मिळणारा दर याला केंद्र सरकारची दुटप्पी भूमिकाच जबाबदार असल्याचे मत राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे. देशात जीएम सोयाबीनवर बंदी आहे अशातच सोयापेंडची केंद्र सरकारने आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच सोयाबीनचे दर झपाट्याने उतरत आहेत. एकीकडे पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे दर नसल्याने शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकारने दुटप्पी भुमिका घेतल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. असे मत भुसे यांनी व्यक्त केले.


नियम,निकष न लावता नुकसानग्रस्तांना मदत मिळावी–विनायक सरनाईक

जिल्ह्यामध्ये काल परवा पासुन सततधार व मुसळधार पाऊस सुरू आहे.यामुळे धरणं भरुण वाहत आहेत तर नद्या जलमय झाल्याने २८सप्टेंबर रोजी पैनगंगा नदिला मोठा पुर आल्याने नदिकाठच्या गावांना या पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने नदिकाठच्या शेतामधील सोयाबीन पिक पाण्यात गेले असुन मोठे नुकसान शेतकर्याचे झाले आहे.या नुकसानग्रस्त भागाची पाहणी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी केली असुन कुठलेही नियम,अटि,निकष न लावता तालुक्यातील नुकसाग्रस्त शेतकर्याना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यासह सरनाईक यांनी केली आहे.


नगर जिल्ह्यात उडदाच्या उत्पादनात यंदा मोठी घट

नगर : नगर जिल्ह्यात उडदाचे पीक बहारात असताना पावसाने साधारण महिनाभर ताण दिला. त्याचा परिणाम शेंगा पोसण्यावर झाला आणि आता उत्पादन हाती आल्यावर उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा हेक्टरी ४ क्विंटल २१ किलो उत्पादन निघाल्याने एकरी १ क्विंटल ६९ किलो उडीद निघाल्याचे कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातून स्पष्ट होत आहे. गेल्यावर्षी हेक्टरी ९ क्विंटल ५३ किलोचे उत्पादन निघाले होते. गतवर्षाच्या तुलनेत यंदा निम्‍म्याने घट झाली आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email