शेती विषयक बातम्या-30 संप्टेंबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या-30 संप्टेंबर

 

72 तासानंतरही पिक पाण्यात, कसा करणार नुकसानीचा दावा ? काय आहे पर्याय

शेतकऱ्यला पदरात पाडून घ्यावयाची असेल तर नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये नुकसानीचा दावा तो ही ऑनलाईन करायचा आहे. मात्र, पाऊस पडून 72 तास उलटले तरी शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे. शिवाय पावसामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक ह्या वेगळ्याच. साचलेल्या पाण्यामुळे शेतामध्येच प्रवेश करता येत नाही त्यामुळे नुकसानीचा दावा करावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.


सोयाबीनची आवक वाढली, दर स्थिरच, शेतकऱ्यांनी योग्य दराची प्रतिक्षा करावी

सोयाबीनचे दर हे स्थिर असून 6900 चा दर सोयाबीनला सौद्यात मिळाला तर पोटलीमध्ये 6400 रुपये क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. तर दुसरीकडे उडदाला 7160 रुपये दर मिळाला आहे. बाजारपेठेत या दोन मुख्य पिकाचीच आवक सुरु असून बाजारात कमालीची शांतता पाहवयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रची गडबड न करता योग्य बाजार भावाची प्रतिक्षा करणे आवश्यक असल्याचे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे.


बदलत्या हवामानानुसार संशोधन ही काळाची गरज : कृषीमंत्री भुसे

शेती व्यवसयामध्ये अमूलाग्र बदल होत असले तरी राज्यात कोरडवाहू क्षेत्र हे अधिक आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती क्षेत्रात या बदलत्या हवामानानुसार संशोधन होणे आवश्यक आहे. त्यानुसार पीक पध्दती, मशागत, तंत्रज्ञान आणि नविन वाणाची सुधारणा शक्य होणार असल्याचे मत राज्य कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले आहे. दोन दिवस त्यांनी सांगोला आणि सोलापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोहोचली आहे. आज (ता. ३०) ही प्रणाली पुन्हा तीव्र होणार आहे. तर उद्या (ता. १) अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पश्‍चिमेकडे सरकून जाणाऱ्या या प्रणालीमुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात जोरदार वाऱ्यासह उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.


आंबिया बहरातील पीकविमा परताव्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

अमरावती : जिल्ह्यातील १६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी आंबिया बहराकरिता फळपीक विमा काढला होता. भरपाई संदर्भातील निकषांची पूर्तता केल्यानंतरही या शेतकऱ्यांना अद्यापही विमा परतावा मिळाला नाही. त्यामुळे परतव्याची प्रतीक्षा केव्हा संपणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.


खान्देशात पाण्याने लावली वाट! कांद्याची रोपे झाली मातीमोल

खान्देश मधील जळगाव जिल्ह्यात पाण्याने पार कहर केला आहे. पाण्यामुळे सोन्यासारखे पिक शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर राख होताना दिसतेय. उन्हाळी कांदा थोडापार शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवला होता परंतु त्याला पण ग्रहण लागले आणि कांदा वेळेपूर्वीच सडायला सुरवात झाली. आता, ह्या अनियमित पावसामुळे कांद्याची रोपे आता मरू लागली आहेत.


राज्यातील 82 टक्के धरणे भरली, काही ओव्हरफ्लो

राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील अनेक धरणे भरली असून तुफान पावसाने राज्यातली 82 टक्के धरणे भरली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email