शेती विषयक बातम्या- 1 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 1 ऑक्टोबर

 

मंत्री- आमदारांच्या कारखान्याकडेही कोट्यावधींची ‘एफआरपी’ रक्कम थकीत

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, थकीत एफआरपी रकमेचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मध्यंतरी परभणी जिल्ह्यात तब्बल 62 कोटींची थकीत रक्कम असल्याचे समोर आले होते तर आता सांगली जिल्ह्यात तर मंत्री आणि आमदारांकडे असलेल्या कारखान्यांकडे 712 कोटींची ऊसाची एफआरपी थकीत आहे.


दिलासादायक : गतवर्षीच्या पिकविम्याला राज्य सरकारचा हिरवा कंदील, 4 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ

गतवर्षी खरीप हंगामात बीड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पॅटर्नचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे चित्र आहे. त्याअनुशंगाने प्रशासनाकडूनम पाठविण्यात आलेल्य़ा प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 10 हजार रुपयांचा फायदा होणार आहे. याकरिता 936 कोटींचा पीक विमा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय झााला आहे.


शेतातल्या पाण्यात लोटांगण आंदोलन, अद्याप पंचनामे होत नसल्याने गंगापूरच्या शेतकऱ्यांचा संताप

मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीला चांगलाच फटका बसला आहे. अनेक ठिकाणची उभी पिकं पाण्यात गेली आहेत. पावसाला उघडीप मिळून चार दिवस झाले तरी शेतातील साठलेलं पाणी हटलं नाही. मेहनतीने वाढवलेल्या पिकांचे हे हाल पाहून शेतकऱ्यांची घोर निराशा होत आहे. त्यातच चार दिवस उलटूनही सरकारकडून कुणी अधिकारी वा विमा कंपन्यांचे अधिकारी शेतात पंचनामे करण्यासाठी न आल्याने शेतकरी संतप्त आहेत. गंगापूर तालुक्यातील धामोरी गावातील शेतकऱ्यांनी हा राग व्यक्त करण्यासाठी शेतातील साचलेल्या पाण्यात लोटांगण आंदोलन केले.


‘ड्रोन’ च्या वापराने शेती क्षेत्राला मिळणार चालना, डिजीटल कृषी मिशनवर लक्ष केंद्रीत करा : कृषीमंत्री तोमर

कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारने सुरु केलेल्या डिजीटल कृषी मिशनवर देखील लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. कृषी मंत्रालयाने डिजिटल शेती विकसीत करण्यासाठी खासगी क्षेत्राशी सामंजस्य करार केला आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि त्यांना सर्व प्रकारे फायदा करून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे.


मराठवाड्यात २५ लाख हेक्‍टरवर पिकांचे नुकसान

औरंगाबाद : एकामागून एक नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या मराठवाड्यामध्ये शेती पिकांचे बाधित क्षेत्र २५ लाख ९८ हजार २१३ हेक्टरवर पोहोचले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २७ व २८ सप्टेंबर या दोन दिवसांत तब्बल १० लाख ५६ हजार ८४८ हेक्टर बाधित क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे. तर १ जून ते २८ सप्टेंबर दरम्यान जवळपास २२५४ कोटी ११ लाख ७५ हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.


‘महाडीबीटी’चे काम ऑनलाइनच

पुणे: महाडीबीटी संकेतस्थळावरील कामकाज पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनेच करणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पुन्हा ऑफलाइन कागदपत्रांची मागणी करू नका, अन्यथा अशा अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा देणारा आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी जारी केला आहे


साखर उद्योग आयकर विभागाच्या रडारवर?, पूर्णा सहकारी साखर कारखान्याला 86 कोटींची नोटीस

राज्यातील 60 सहकारी साखर कारखान्यांना आयकर विभागानं नोटीस पाठवल्या आहेत. आयकर विभागानं साखर कारखान्यांना नोटीस पाठवल्यानंतर साखर उद्योगात खळबळ उडाली आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email