शेती विषयक बातम्या- 2 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 2 ऑक्टोबर

 

देशभरात आता कृषी आवजारांची एकच किंमत, सरकार निर्णयाचा शेतकऱ्यांना होणार फायदा

केंद्रीय कृषी राज्य मंत्री शोभा करंडलाजे यांनी अवाजारांच्या दराबाबत मोठी घोषणा केली आहे. कृषी यंत्र निर्मिती कंपन्या आणि डीलर्सना त्यांची उत्पादने ही एकाच किंमतीत देशभरात विकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. गोवा येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे.


आता आंबिया फळपिकासाठीही लागू होणार पीकविमा, कृषी विभागाचा निर्णय

आंबिया बहराकरीता राज्यातील डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी या 9 फळ पीकांसाठी हवामाह आधारित फळ पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. याकरिता पीक विमा कंपन्या आणि अर्ज करण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.


कृषी क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल : केंद्रीय कृषी मंत्री

शेतीचे आधुनिकीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. डिजीटल कृषीचा उपक्रम हा सुरु करण्यात आला असून देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान राहणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.


राज्य सरकराचा शेतकऱ्यांना दिलासा : विम्यापोटी 973 कोटी 16 लाखाचा निधी विमा कंपन्यांना वर्ग

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 साठी विविध पिक विमा कंपनीस शासनाच्या वतीने राज्यशासनाच्या हिश्याची रक्कम अदा करण्यात आली आहे. राज्य सरकारने 6 विमा कंपन्यांना 973 कोटी 16 लाख 47 हजार 758 रुपये अदा केले आहेत त्याअनुशंगाचा शासन निर्णयही झाला


मराठवाड्यात आज पुन्हा पावसाची शक्यता ; जायकवाडीतून विसर्ग सुरूच

मराठवाड्यात मागील दोन दिवसात पावसाने काहीशी उसंत दिली होती. मात्र पुढील तीन चार तासात मराठवाड्यातील काही भागात पुन्हा एकदा मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आधीच नुकसान झालेल्या शेतात शेतकरी काहीसा सावरू पाहतोय तोवर पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. स्थानिक शेतकरी आता पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. जायकवाडी धरणातून देखील विसर्ग सोडण्यात येत आहे.


कथा साखर कारखान्याची, व्यथा शेतकऱ्यांच्या थकीत ‘एफआरपी’ रकमेची

‘एफआरपी’ ची रक्कम अदा करण्यासाठी साखर कारखान्याची जागा विक्रीला काढणाऱ्या अंबा सहकारी साखर कारखान्याची. शेतकऱ्यांची थकीत ‘एफआरपी’ रक्कम देण्यासाठी या कारखान्याने 25 एक्कर जमिन विक्रीस काढलेली होती. याला साखर आयुक्तालयाची परवानगीही मिळाली त्यानुसार तब्बल एक हजार शेतकऱ्यांना 1900 प्रमाणे ‘एफआरपी’ वाटपही करण्यात आला पण आता जमिन विक्रीसंदर्भात कारखान्याची चौकशी करण्याचे आदेश सहकार मंत्री यांनी दिले आहेत.


हातातोंडाशी आलेलं सोयाबीन मातीमोल, रब्बीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, सॅम्पल पंचनामे करा, सेना आमदाराचं मुख्यमंत्र्यांना साकडं

मराठवाडा आणि उस्मानाबादमध्ये गुलाब चक्रीवादळामुळं झालेल्या मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यीतील 2 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. एकूण नुकसानापैकी 90 टक्के पीक हे सोयाबीनचं होतं. सोयाबीनच्या शेतात पुराचं पाणी घुसल्यानं सगळं पीक वाया गेलं आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email