शेती विषयक बातम्या- 4 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 4 ऑक्टोबर

 

20 हजार कोटी रुपये अदा केले, मात्र 500 कोटींमुळे अर्धवट राहिली ‘महाविकास आघाडी’ची पीक कर्जमाफी

आजही तब्बल 63 हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार देणार असल्याची घोषणाही हवेत विरली आहे. सत्ता स्थापित होताच 20 हजार 59 कोटीं रुपये राज्यसरकारने अदा केले होते मात्र, आता 500 कोटींमुळे उर्वरीत शेतकऱ्यांना या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ अद्यापही मिळालेला नाही.


‘लक्षात असू द्या’ कोऱ्या कागदावर सह्या म्हणजे फसवणूक, आ. माधवराव पाटलांकडून विमा कंपन्यांच्या कारभाराची पोलखोल

पंचनाम्यादरम्यान पिक विमा कंपनीचे प्रतिनीधी हे किती टक्के नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांना काही माहिती सांगत नाहीत तर बांधावरून पंचनामा करुन कोऱ्या कागदावर शेतकऱ्यांची सही घेतात. याचा अर्थ हा पंचनामा आम्हाला मंजूर असून यापोटी जी रक्कम मिळणार याच्याशी सहमती दर्शवितो. त्यामुळे नुकसानीची टक्केवारी माहिती झाल्याशिवाय कोणत्याही कागदावर सह्या न करण्याचा सल्ला हिमायत नगरचे आ. माधवराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शिवाय विमा कंपनीचा कारभार कशा पध्दतीने चालतो हे सांगताना त्यांची जीभही घसरली.


उडदाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांनो मालाची काळजी घ्या अन् योग्य दर मिळवा

काही भागांमध्ये उडदाची काढणी झाली आहे तर काही भागात ही कामे सुरु आहेत. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने उडदाचे दर वाढत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमध्ये दर हे वाढत आहेत. त्यामुळे काढणी झालेल्या उडदाची योग्य कळजी घेतली तर शेतकऱ्यांना सुधारित दर मिळणार आहे. 3000 पासून 8000 पर्यंत उडदाला दर मिळत आहेत.


छत्तीसगडच्या शेतकऱ्याने नापीक जमिनीत आणली हिरवळ, आज 500 लोकांना रोजगार

संदीप लोहानच्या जिद्दीने आणि मेहनतीचा अंदाज लावला जाऊ शकतो की, त्याने 150 एकर खडबडीत जमीन शेतीसाठी निवडली. मात्र, कृषी तज्ज्ञांसह अनेकांनी त्याच्या जमीन निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण संदीप लोहानने हिंमत हारली नाही आणि आज त्याच भूमीवर 500 हून अधिक लोक काम करत आहेत.


कोकण ते विदर्भ मराठवाड्यावर मुसळधार पावसाच संकट, IMD कडून नवा अंदाज जारी

भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


खत परवान्याची ऑफलाइन अर्ज पद्धत अखेर बंद होणार

पुणे: गैरव्यवहाराला चालना देणारी खताची जिल्हा पातळीवरील ऑफलाइन परवाना पद्धत कायमची बंद करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.


डाळिंबाच्या ८० हजार हेक्टर बागांना फटका

यंदा अतिपाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे तेलकट डाग, कुजवा आणि पिन होल बोअरर (खोड कीड) याचा मोठा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.


केळी फळाला मोठी मागणी ,आवक घटल्यामुळे केळीच्या भावात वाढ

सणासुदीच्या काळात केळी ची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे बाजारपेठेत केळीला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे प्रति क्विंटल केळी मागे 20 रुपयांनी दर वाढ झालेली आपल्याला जळगाव जिल्ह्यतील बऱ्हाणपूर बाजारात बघायला मिळत आहे.तसेच बाजारात केळीला दर हा 1230 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळाला आपल्याला पाहण्यास मिळत आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email