शेती विषयक बातम्या- 5 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 5 ऑक्टोबर

 

शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेने देशभर संताप

लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश : येथे कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर दोन मोटारी घातल्याने चार शेतकऱ्यांसह एका पत्रकाराच्या मृत्यूच्या घटनेचा देशभरात तीव्र निषेध आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता.४) देशभरात शेतकरी, शेतकरी नेते, सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षांनी निर्देशने केली.


पीक नुकसान तुमचे, जबाबदारीही तुमचीच ; शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल

ज्या भागातील सर्व्हेक्षण यापुर्वी झालेले आहे अशा भागात पुन्हा सर्व्हेक्षण होणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे. त्यामुळे पंचनामे नंतर झालेल्या नुकसानीचे काय असा सवाल आता शेतकऱ्यांसमोर आहे. याच धास्तीने शेतकरी आता पीक विमा तक्रारींवर भर देत आहे. नुकसानीनंतर उत्पादनापेक्षा पीकविमा मदतीचाच हातभार मिळणार असल्याने आता तक्रार दाखल करण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलेले आहे.


‘या’ कारणांमुळे घसरले चिकन, अंड्याचे दर ; दीड वर्षापासून वाढले होते भाव

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वेगवेगळ्या अफवांमुळे चिकन आणि अंड्याचे दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे पोल्ट्रीचालक अडचणीत आले होते. त्यानंतर मात्र, वाढलेले दर हे तब्बल दीड वर्ष कायम राहिले होते. आता दर घटन्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. एकतर सोयामील आयातीच्या घोषणेनंतर सोयाबीनचे दर हे कोसळले आहेत. त्यामुळे कुक्कुटपालनावर होणारा खर्च हा कमी झाला आहे. तर दुसरीकडे सध्या सणासुदीचे दिवस असल्याने अंडी आणि चिकनच्या मागणीत घट होत आहे. त्यामुळे दीड वर्षानंतर आता अंडी- चिकनच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली पाहवयास मिळत आहे.


कारखाने सुरु करण्यासाठी ‘रेड झोन’ मधील साखर कारखान्यांची अनोखी शक्कल

आतापर्यंत ‘एफआरपी’ थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांनी आंदोलने, निदर्शने केली होती. शिवाय साखर आयुक्तालयाकडून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांची यादीही जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे साखर कारखान्यांचा कारभार चव्हाट्यावर आला असून शेतकरी आता ऊस घालणार की नाही अशी स्थिती असतानाच ‘एफआरपी’ थकीत रकमेच्या अनुशंगाने हमीपत्र घेतल्याचे लेखी सांगत हे कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत.


महाराष्ट्र राज्यात येत्या ४ दिवसात जोरदार पावसाचा इशारा

4 दिवसात महाराष्ट्र राज्यातील अनेक भागात दुपारी नंतर ढगाळ वातावरण तयार होऊन तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज सुद्धा हवामान खात्याने वर्तवला आहे


पीकविमा तक्रारी पोहोचल्या दोन लाखांवर

हवालदील शेतकऱ्यांकडून पीकविमा तक्रारींवर भर दिला जात आहे. पाच जिल्ह्यांत सुमार २ लाख ६३ हजारांवर तक्रारी आजवर दाखल झाल्या आहेत.


खानदेशात युरिया शिल्लक रब्बीतही उपलब्ध होणार

जळगाव : खानदेशात युरियाची खरिपात मोठी टंचाई जाणवली. परंतु रब्बी हंगामात युरियाचा वापर कमी झाला असून, पुरवठा सुरळीत किंवा हवा तेवढा झाला. यामुळे युरिया शिल्लक असून, हा साठा आगामी खरीप हंगामातही उपलब्ध होणार आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email