Search
Generic filters

शेती विषयक बातम्या- 25 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 25 ऑक्टोबर

 

रब्बीची लगबग सुरुयं, मग कृषी विभागाचा सल्ला पाहूनच करा पेरणीचा श्रीगणेशा
रब्बीच्या पेरणीबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे. ज्यामाध्यमातून पेरणीची आणि पीक जोपासण्याची माहिती शेतकऱ्यांना होणार आहे. पावसाने उघडीप दिल्याने खरीपातील कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली असून आता रब्बी हंगामाची लगबग पाहवयास मिळत आहे. त्याचअनुशंगाने कृषी विभागाचा हा सल्ला शेतकऱ्यांसाठी महत्वाचा राहणार आहे.

महिला शेतकरी गट होणार ‘आत्मनिर्भर’, कृषी महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम
ग्रामीण भागातील महिला गट आणि विकास सोसायट्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा अनोखा फंडा पुणे येथील महात्मा फुले कृषी महाविद्यालयाने हाती घेतला आहे. त्यामुळे उद्योगातील ज्ञान तर वाढणार आहेच शिवाय मार्केटचाही अभ्यास या ग्रामीण भागातील महिलांना होणार आहे. यामध्ये महिला गटांनी केवळ तेलबिया आणायच्या आहेत आणि खाद्यतेल बनवून घ्यावयाचे आहे.

फळ पिक विमा योजना अन् शेतकऱ्यांना मिळतो परतावा
पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करता फळ पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना राबवली जात आहे.

काय आहे ‘कृषी कर्ज मित्र’ योजना ? शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार कर्ज
शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी कर्ज मित्र योजना राबविण्यात येत आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी कर्ज मित्र योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित करण्यात आला आहे.

विम्यासाठी फळबागायतदार ‘वेटिंगवर’ या पर्यायांची अमलबजावणी करा अन् परतावा मिळवा
पीक विमा कंपनीचे धोरण हे कायम शेतकऱ्यांच्या विरोधात राहिल्याचे पाहवयास मिळत आहे. यंदाही अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे. सर्व चित्र समोर असतानाही त्या प्रमाणात नुकसान नसल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे फळबागायत शेतकऱ्यांच्या परताव्याला निधी नसल्याचे कारण सांगितले जात आहे.

सोयाबीनच्या मागणीत वाढ पण दरात ? शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी ?
सोयाबीन काढणी-मळणी झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब समोर येत आहे. गत आठवड्यात राज्यात तब्बल 9 लाख क्विंटल सोयाबीनची आवक होऊन देखील मागणी वाढत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी तर होणार नाहीत हे निश्चित मानले जात आहे. मात्र, ते वाढणारही नाहीत असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री करायची की, साठवणूक हा निर्णय आता शेतकऱ्यांना घ्यावा लागणार आहे.

पाऊस, अतिवृष्टी नंतर आता बुरशीचा प्रादुर्भाव, फळबागांच्या उत्पादनात निम्म्याने घट
निसर्गाच्या चक्रातून यंदा शेतकऱ्यांची सुटका होताना दिसत नाही. यापूर्वी अतिवृष्टी सततचा पाऊस आणि आता बुरशीजन्य किटकांचा प्रादुर्भाव फळबागांवर झालेला आहे. त्यामुळे पावसाचा आणि बदललेल्या वातावरणाचा परिणाम केवळ सोयाबीन, कापूस या खरीपातील पिकांलवरच नाही तर संत्री, पपई या फळबागांवरही झालेला आहे.

वखार महामंडळाचा अनोखा उपक्रम, शेतीमालाला मिळणार योग्य दर
शेतीमाल साठवणूकीसाठी वखार महामंडाळाने तशी सोय केली आहे. शेतीमाल तारण कर्ज या माध्यमातून शेतीमालाची साठवणूक करता येते शिवाय कर्जही मिळते. मात्र, याबाबत जनजागृती नसल्याने वखार महामंडाळाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या सर्व योजनांची माहीती देण्यासाठी वखार आपल्या दारी हे अभियान राबवले जाणार आहे.

खरीपाच्या अंतिम टप्प्यात हमीभाव केंद्रचा आधार, किनवटमध्ये खरेदी केंद्र
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून जिल्ह्यातील पहिले खरेदी केंद्र हे किनवटमध्ये सुरु करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अखेर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email