Search
Generic filters

मातीतच करा “उगवण क्षमता” तपासणी-उत्तम पुणे

माती माहिती

मातीतच करा “उगवण क्षमता” तपासणी-उत्तम पुणे

 

खात्रीशीर बियाणे मिळणे यावरच शेतकऱ्याचे पुढील सर्व भवितव्य अवलंबून असते. त्या दृष्टीने बियाणे उगवण क्षमता तपासणीस अनन्य साधारण महत्व आहे.

 

बियाणे (सोयाबीन) उगवण क्षमता तपासणी साठी १० मिनिट बी पाण्यात  ठेऊन (झटपट पद्धत), पेपर मेट वर ,ओल्या बारदान मध्ये इत्यादी पद्धती सांगितल्या जातात.शास्त्रीय दृष्ट्या त्या बरोबर यात शंका नाही.पण इथ कुठच बियाणे व मातीचा (जमीन) संबंध येत नाही. यात बीज अंकुरण होणे हे स्पष्ट होते.पण प्रत्येक्षात जमिनीत बी उगवून येणे ही क्रिया नैसर्गिक व वेगळीच.त्याला गरज असते पोषक वातावरणाची,वेळ,काळ व जमिनीतच पेरण्याची. उदा.म्हणून…बंदिस्त रोप वाटिका मधील रोप जेव्हा मोकळ्या , खुल्या वातावरणात मातीत (जमिनीत) लावली जातात तेव्हा ती शंभर टक्के तग धरू शकत नाही.

अनेकदा ती जमीन व तेथील तापमान यास बळी पडतात.तसेच काहीसे शेतकऱ्यांना  प्रशिक्षण व मार्गदर्शन करताना बियाणे उगवण क्षमता तपासणीचे प्रयोग सांगितले जातात ते शत प्रतिशत प्रणाम मानता येणार नाही.

माझे मत व अनुभव …उगवण क्षमता ही मातीत तपासणे गरजेचे.जमीन ही प्रत्येक ठिकाणी सारखी नाही, तिला मिळणारे वातावरण स्थळ,काळ नुसार बदलते.जमिनीचा पोत वेगवेगळा,तापमानात बदल,पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी अधिक असणे ह्या व इतर अनेक बाबी बियाणे उगवण क्षमतेवर परिणाम करू शकतात. तेंव्हा वरील पद्धती तांत्रिक दृष्ट्या बरोबर असल्या तरी बियाण्याची उगवण क्षमता तपासणी ही बी मातीत टाकूनच तपासली जाणे नैसर्गिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मत प्रयोगशिल शेतकरी व शेती अभ्यासक उत्तम पुणे यांनी आपल्या बावीस वर्ष शेतीतील अनुभवावरून व्यक्त केले. मातीतच करा “उगवण क्षमता” मातीतच करा “उगवण क्षमता”

उत्तम बादशहा पुणे
बी.कॉम.एम.ए.अर्थशास्त्र
९९२२८२७६१३
मु.पो..ब्राम्हणगावं
तालुका..कोपरगाव
जिल्हा…अहमदनगर
दिनाक..१५/४/२०२१

Leave a Comment

Your email address will not be published.