PM Kisan: निधीसह या दोन योजनांचा मोफत लाभ
पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेता येणार आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकार एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम १० एप्रिलाच्या सुमारास पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेता येणार आहे.
वाचा :- PM Kisan Scheme : या महिन्यात आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार
किसान क्रेडिट कार्डनं सहजरित्या कर्ज
पीएम किसान सन्मान योजना आणि किसान क्रेडिट कार्ड लिंक करण्यात आलं आहे. २४ फेब्रुवारी २०१९ ला याबाबत निर्णय घेण्यात आला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येईल वर्षभरातचं त्याची परतफेड करावी लागणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज ९ टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार यावर २ टक्के सूट देते. वेळेत कर्ज फेड केल्यास ३ टक्के आणखी सूट मिळते. शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे ४ टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं. देशात किसान क्रेडिट कार्डचा वापर 8 कोटी शेतकरी करतात.
पीएम किसान मानधन योजना
पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेता येतो. केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची सर्व माहिती असते त्यामुळे वेगळी कागदपत्रं जमा करावी लागत नाहीत. किसान सन्मान योजनेच्या मिळणाऱ्या ६ हजार रुपयांमधूनचं किसान मानधन योजनेचा प्रीमियम कापला जातो. ही प्रक्रिया सुरु राहिल्यास शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम २५ डिसेंबर २०२० पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत ९ कोटी ४१ लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा १ डिसेंबर ३१ ते मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.
ajitborkar3806@gmail.com