Search
Generic filters

शेतकऱ्यांना मिळणार दरमहा ३००० हजार रुपये : वाचा सविस्तर काय आहे योजना

farmers-will-get-rs-3,000-per-month-in-addition-to-rs-6,000-per-year

शेतकऱ्यांना मिळणार दरमहा ३००० हजार रुपये : वाचा सविस्तर काय आहे योजना

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत वर्षाला मिळणाऱ्या ६००० रुपयांच्या व्यतिरिक्त दरमहा ३००० रुपये पेन्शन दिली जाणार आहे. ही योजना बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही माहीत नाहीये

 

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान मान धन योजने अंतर्गत ६० वर्षे वयाच्या पात्र शेतकऱ्यांना दरमहा ३००० रुपये पेन्शन दिली जाते. म्हणजेच जर एखाद्या शेतकऱ्याचं वय ६० वर्षे असेल तर त्याला पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत वर्षाला मिळणाऱ्या ६००० रुपयांच्याव्यतिरिक्त दरमहा ३००० रुपये पेन्शन दिली जाणार आहे. ही योजना बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही माहीत नाहीये.

 

हे वाचा :- काय आहे ठाकरे सरकारचं विकेल ते पिकेल अभियान : वाचा सविस्तर

 

संसदीय समितीचेही मोदी सरकारवर ताशेरे

संसदीय समितीनेही पंतप्रधान किसान मान धन योजनेंतर्गत अत्यंत कमी नोंदी केल्याबद्दल मोदी सरकारवर ताशेरे ओढलेत. प्रधानमंत्री किसान मान धन योजना सप्टेंबर २०१९ मध्ये सुरू करण्यात आली असून, आर्थिक वर्ष २०२१-२२ पर्यंत सुमारे ५ कोटी लाभार्थ्यांना संरक्षण देण्याचे उद्दिष्ट होते. नंतर हे लक्ष्य ३ कोटी करण्यात आले.

 

१८ ते ४० वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेंतर्गत नोंदणी करण्यास पात्र

प्रधानमंत्री किसान मान धन योजना ही अल्प आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी पेन्शन योजना आहे, ज्यांची २ हेक्टर क्षेत्रापर्यंत शेती योग्य आहे. त्यांना याचा लाभ मिळू शकतो. १८ ते ४० वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेंतर्गत नोंदणी करण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत, शेतकऱ्याला ६० वर्षांचे झाल्यावर दरमहा ३००० रुपये पेन्शन दिली जाते.

 

पीएमकेएमवाय ही एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना

भाजपा खासदार पी. सी. गड्डीगौदार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विषयक संसदीय स्थायी समितीने सांगितले की, आतापर्यंत एकूण २१,२०,३१० शेतकर्‍यांनी पंतप्रधान किसान मान धन योजनेंतर्गत नोंदणी केलीय. समिती म्हणाली की, पीएमकेएमवाय ही एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी आपल्या समाजातील महत्त्वपूर्ण वर्गास आर्थिक सुरक्षा प्रदान करते. ही योजना योग्य प्रकारे अंमलात आणल्यास लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत होईल आणि वृद्ध वयात त्यांना सन्माननीय जीवन जगात येईल. परंतु या योजनेत शेतकऱ्यांचा रस नसल्यामुळे समिती खुश नाही. समितीने कृषी मंत्रालयाला अशा कमी नोंदणीची कारणे शोधण्यासाठी आणि गरज पडल्यास योजनेत योग्य त्या दुरुस्त्या करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरुन ते शेतकर्‍यांना योजनेकडे आकर्षित करू शकतील.शेतकऱ्यांना मिळणार दरमहा ३००० हजार रुपये

संदर्भ :- tv9 marathi.com

शेती विषयक माहिती pdf

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published.