Search
Generic filters

ऊसाचे पाचट व्यवस्थापन कसे करावे व कश्या प्रकारे होतो फायदा ?

ऊसाचे पाचट व्यवस्थापन कसे करावे

ऊसाचे पाचट व्यवस्थापन कसे करावे व कश्या प्रकारे होतो फायदा ?

 

ऊसाचे पाचट sugarcane आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते. त्यामुळे जfवाणू वा गांडुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.

 

पीक वाढीनुसार पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, कमी होणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होत आहे. यावर ऊसाचे पाचट व्यवस्थापन हा योग्य व शाश्वत उपाय आहे. खोडवा उसाकडे दुर्लक्ष होते. उसाची तोडणी झाल्यानंतर बहुतांशी क्षेत्रावरील उसाचे पाचट जाळून टाकले जाते. तसेच शेणखत वापराचे प्रमाण कमी झाले आहे. पाचट जाळल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जळून नष्ट होतात, परिणामी जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण फारच कमी होते. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर बिघडत आहे.

 

ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक सरी ठेवून कुजविल्यास पाण्याचा वापर ५० टक्‍क्‍यांपर्यंत कमी होऊ शकतो. जमिनीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकते. अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा खर्चात बचत होते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून ओलावा जास्त काढण्यास मदत होते. पाचट शेतातच ठेवल्याने तणांचे व्यवस्थापन होते. ऊसाचे पाचट व्यवस्थापन कसे करावे

 

हे पण वाचा :- कसे करावे उन्हाळी कांद्याचे नियोजन व साठवणुक ? वाचा सविस्तर

 

सेंद्रिय खताची उपलब्धता :- Availability of Organic Fertilizer

एक हेक्‍टर क्षेत्रामधून सुमारे १० ते १२ टन वाळलेले पाचट मिळते. हे पाचट न जाळता ते कुजवल्यास सहा ते सात टन सेंद्रिय खत मिळते. यामुळे जमिनीची सुपीकता सातत्याने वाढते.
पाचट तंत्रज्ञानामुळे जमिनीची सुपीकता तीन ते चार वर्षे टिकून राहील तितकेच खोडव्याचे पीकही सातत्याने घेता येईल. यामुळे बेणे, मशागत व मजुरी खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल.

 

उत्पादनात भरीव वाढ :- Substantial increase in production

कोणत्याही निविष्ठावर विनाकारण खर्च न करता पाचट तंत्रज्ञानामुळे यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. पाचट शेतात ठेवल्यामुळे पाल्यातील मुख्य अन्नद्रव्य उदा. नत्र ४० ते ५० किलो, स्फुरद २० ते ३० किलो, पोटॅश ७५ ते १०० किलो तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, मंगल, तांबे, जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पाचटाचे विघटन होताना ऊस पिकास उपलब्ध होतात. त्याचा उत्पादन वाढीवर परिणाम दिसून येतो.

 

जमिनीचे तापमान :- Soil temperature

  • रुंद सरी पद्धतीने ऊस लागवड केल्याने जमिनीवर अधिक काळ सूर्यप्रकाश राहतो. त्यामुळे पिकास उपयोगी सूक्ष्मजंतू व गांडुळाची वाढ पाहिजे त्या प्रमाणात होत नाही.
  • पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते. त्यामुळे जीवाणू वा गांडुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.
    दिलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून ते पिकास उपलब्ध होतात. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते.

 

आंतर पीक :- Inter-crop

खोडवा उसामध्ये पाला एक आड एक सरीमध्ये ठेवल्यामुळे एक सरी रिकामी राहते. या सरीत शेतकऱ्यांनी मूग, उडीद, चवळी इत्यादी द्विदलवर्गीय पिके घेऊन ती पक्व झाल्यानंतर त्यांच्या केवळ शेंगा काढून घ्यावेत. उर्वरित अवशेष त्याठिकाणी सरीत राहू दिल्याने सेंद्रिय खत उपलब्ध होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता सुधारते. साधारणपणे दहा गुंठयात अर्धा ते एक किलो कडधान्य पेरल्यास सुमारे २५ ते ३० किलो पर्यंत उत्पादन मिळू शकते.

 

पाचट शेतात ठेवण्याचे फायदे 

मशागतीच्या खर्चात ५० टक्के बचत :-

  • ऊस तोडणी झाल्यानंतर शेतकरी उसाचे पाचट जाळून टाकतात, सर्व सरीच्या बगला फोडून रासायनिक खताची मात्रा देऊन पाणी दिले जाते. पाणी व खताच्या जरुरीपेक्षा अधिक वापराने तणांची मोठ्या प्रमाणात वाढ होते.
  • उसाचे पाचट न जाळता ते एक आड एक ठेवल्यास किंवा सर्व सरीत पाचट दाबून बसवावे. या आच्छादनामुळे जागेवर तण उगवत नाहीत. त्यामुळे अन्नद्रव्यांचा होणारा अपव्यय व तण व्यवस्थापनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.

ओलावा टिकतो :-

  • पाचट एक आड एक सरी किंवा सर्व सरीत ठेवल्यानंतर सर्व सरीत पाणी देण्यासाठी एक आड एक सरीस पाणी द्यावे लागते. तसेच पाचट ठेवल्यामुळे ५० टक्के क्षेत्र आच्छादित राहते. त्यामुळे बाष्पीभवन कमी होते.
  • जमिनीतील ओलावा १५ ते २० दिवस टिकून राहतो. यामुळे पाणी देण्याची वारंवारता कमी होऊ शकते. शिवाय केशाकर्षणाद्वारे पाचट ठेवलेल्या सरीतील माती पाणी शोषत असल्याने पाणी दिल्यावरही लवकर वाफसा येतो. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी व हवा योग्य संतुलन राहून मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते. ऊसाचे पाचट व्यवस्थापन कसे करावे

पाचटातील अन्नद्रव्ये (प्रमाण टक्के) सूक्ष्म अन्नद्रव्ये (पीपीएम) :-

 

अन्नद्रव्ये प्रमाण टक्के अन्नद्रव्ये प्रमाण पीपीएम
नत्र ०.५ लोह २४४०
स्फुरद ०.१३ मंगल ३१०
पालाश ०.४० जस्त ९०
कॅल्शिअम ०.५५ तांबे ३०
मॅग्नेशिअम ०.३० गंधक ०.१२

संदर्भ :- agrowon.com

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published.