Search
Generic filters

महाकृषी ऊर्जा अभियान: महाराष्ट्रातील 2 लाख शेतकरी वीज थकबाकीतून मुक्त!

महाकृषी ऊर्जा अभियान: महाराष्ट्रातील 2 लाख शेतकरी वीज थकबाकीतून मुक्त!

 

कृषी वीज बिलातून शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबवण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास संपूर्ण राज्यभरातून चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार थकबाकी मुक्त योजनेत आठ लाख सहा हजार 104 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून 25 मार्च पर्यंत त्यातील एक लाख 92 हजार 529 शेतकऱ्यांनी मूळ थकबाकी पैकी 50 टक्के रकमेचा भरणा करून शंभर टक्के थकबाकी मुक्ती मिळवली आहे. या सगळ्यात थकबाकी मुक्त शेतकऱ्यांना वीजबिल आतून चक्क 255 कोटी 2 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कृषी पंपाच्या वीज बिलातून थकबाकी मुक्त देण्यासाठी एकूण थकबाकी मध्ये तब्बल 66 टक्के सवलत देण्यात येत आहे. त्याप्रमाणे 44,44,165शेतकऱ्यांकडील एकूण 45 हजार 787 कोटी 19 लाख यांच्या एकूण थकबाकी मध्ये वस्ते दहा हजार 421 कोटी रुपयांची निर लेखना द्वारे सूट देण्यात आली आहे, तर 4 हजार 672 कोटी 81 लाख रुपयांचे व्याज व विलंब आकारांमध्ये सोडून देण्यात आले आहे.

या योजनेनुसार कृषी ग्राहकांकडे 30 हजार 693 कोटी 55 लाख रुपयांचे सुधारित मूळ थकबाकी आहे. त्यापैकी पहिल्या वर्षात 50 टक्के थकबाकी भरली असून भरल्यास वीजबिल कोरे करण्याची संधी आहे. महाकृषी ऊर्जा अभियान:

हे पण वाचा:- मागेल त्याला शेततळे योजना माहिती व फायदे

हे पण वाचा:- दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होणार, दादाजी भुसे यांची माहिती!

हे पण वाचा:- गारपीट म्हणजे काय ? आणि ती उन्हाळा सुरु होते असतानाच का होते?

 

संदर्भ:- कृषी जागरण 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

 

Leave a Comment

Your email address will not be published.