Search
Generic filters

ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे इत्यादी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 38 कोटींचा निधी मंजूर

ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे इत्यादी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 38 कोटींचा निधी मंजूर

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 38 कोटींचा निधी मंजूर

राज्य सरकारच्या कृषी विभागानं राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 2020-21साठी 38 कोटींचा निधी मंजूर केला आहे

मुंबई: राज्य सरकारच्या कृषी विभागानं राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 2020-21साठी 38 कोटींचा निधी मंजूर केला आहे. 38 कोटी रुपयांपैकी 19 कोटी वितरीत करण्यास मंजुरी देखील देण्यात आली आहे. यामुळे कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध होणार आहे.

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून खर्च

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं 38 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तर त्यापैकी 19 कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलीय. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

हे वाचा:- किसान क्रेडिट कार्ड मोफत बनवण्याची सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?

कृषी अवजारांसाठी अनुदान 

सध्या शेतीमध्ये पारंपारिक औजारांचा वापर कमी होऊन यांत्रिकीकरण वाढत आहे. शेतीमधील मशागतीची कामं करण्यासाठी हवं तेवढं मनुष्यबळ मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करणं गरजेचे बनत आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध करुन देत आहे.

योजनेचा उद्देश

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेअतंर्गत जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे, अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. हा उद्देश आहे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे, हा उद्देश आहे.

कोणत्या औजारांचा लाभ मिळतो?

1 )ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
४) बैल चलित यंत्र/अवजारे
५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
६) प्रक्रिया संच
७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) स्वयं चलित यंत्रे

ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, महिला शेतकरी यांना 1 लाख ते 1.25 लाख तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 हजार आणि 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते.

शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा

संदर्भ:- TV9 Marathi

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

1 thought on “ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे इत्यादी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 38 कोटींचा निधी मंजूर”

Leave a Comment

Your email address will not be published.