तीन लाखांपर्यंतचे मर्यादीत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज, राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा
कोरोना काळातही राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषीमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला असल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.
मुंबई : कोरोना काळात महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. त्यावेळी कोरोना काळातही राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषीमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला असल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.
कोरोना काळात सर्व क्षेत्रात मंदी असताना राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली. या काळात राज्यातील कृषी आणि सलग्न क्षेत्रात 11.7 टक्के इतकी भरघोस वाढ पहायला मिळाली. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.
हे पण वाचा:-कांदा चाळ योजना: या जिल्ह्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांना मिळाले अनुदान
तीन लाखांपर्यंत मर्यादीत कर्ज घेणाऱ्या आणि त्याची परतफेड वेळेत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला असून 31 लाख 23 हजार शेतककऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. तीन लाखांपर्यंतचे तीन लाखांपर्यंतचे
एपीएमसीच्या बळकटीसाठी 2 हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले असून पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी 3700 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अमरावतीच्या मोर्शीमध्ये संत्रा प्रकल्पाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
राज्यात कृषीपंप जोडणी धोरण राबवणार, महावितरणला 1500 कोटी रुपये प्रस्तावित
- बाजार समित्यांच्या बळकटीसाठी 2 हजार कोटींची योजना
- 4 वर्षात बाजारसमित्यांसाठी 2 हजार कोटी
- कृषी पंप जोडणी धोरण राबवणार
- कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी रुपये
- विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी
- संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार
- 500 भाजीपाला रोपवाटिका उभारणार
- 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी देणार
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार
- 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले
- शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन दिले
- 42 हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटले
- 3 लाख रुपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने
संदर्भ:- ABP माझा