शेणखतालाही वाढला भाव ? : वाचा सविस्तर !
एक ब्रासची किंमत तीन हजार रुपये
सोलापूर : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता घसरत चालली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेती, जैविक शेती करण्यावर भर देत आहेत. त्यासाठी शेतकरी मुख्यतः शेणखताचा वापर करत आहेत. मात्र, यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची पशुधनात होणारी घट यामुळे शेणखताला सध्या सोन्याचा भाव आला आहे. सोलापुरात एक ब्रास शेणखत तीन हजार रुपयांना विकले जात आहे.
वाचा :- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना: GR आला सौर कृषी पंप वाटप सुरू वाचा सविस्तर!
यांत्रिकीकरण, गाय, म्हैस, बैल, शेळ्या अशा पशुधनाच्या किमती वाढल्याचा फटकाही पशुपालनास बसला आहे. चाऱ्याचे वाढलेले भाव व चाराटंचाई यामुळे शेतकरी जनावरे पाळण्यास नकार देत आहेत, तर अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरल्यामुळेही शेणखताची मागणी वाढली आहे. पूर्वी एक हजार ते दीड हजार रुपये ट्रॅक्टर ट्रॉली या दराने शेणखत मिळत होते, ते सध्या चार हजार ते पाच हजार ट्रॉलीप्रमाणे मिळत आहे.
असा होतो शेणखताचा फायदा.
गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. वापराने जमिनीची सुपिकता टिकून राहते आणि विषमुक्त धान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाहीत. शेणखतामुळे वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक व जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. ही अन्नद्रव्ये वनस्पतींच्या मुळाद्वारे पिकांना हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे पीक चादीच्या काळात सतत अन्नपुरवठा कायम राहतो.
जमिनीत शेणखत मिसळताना काय काळजी घ्यायला हवी ?
कमी क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात, खड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असे शेण चांगले कुजलेले असावे. अशा शेणामध्ये हुमणी, कॉकचाफर भुगे, नारळावरील गेंड्या मुंग्याच्या अळ्या आदी किडींच्या अळी आढळतात. त्याला अनेक शेतकरी शेणकिडे’ म्हणतात. अशा विविध भुंगेरावर्गीय किडीच्या अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील पिकाला नुकसान पोचवितात,
भुंगेरावर्गीय किडींची मादी मे-जून महिन्यात शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी घालतात. त्यामुळे शेतातील शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा आदी में महिन्याच्या प्रारंभीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यात घातल्या जाणाऱ्या अड्यानंतर होणारा प्रसार धांबविता येतो.
शेणखत जमिनीत मिसळताना त्यात सापडणार्या भुगेऱ्यांच्या अळ्या वेचून नष्ट कराव्या. उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची कमी झाल्यावर शेतकरी मोकळ्या शेतात जनावरे चरण्यास सोडतात. त्यांचे शेण शेतात विखुरलेल्या स्वरूपात पडते.
मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरवातीला पडणाऱ्या पावसाबरोबरच हुमणीच्या मादी भुंगेन्यांकडून अशा कुजणाऱ्या शेणात अंडी घालतात. त्यामुळे शेतात पुढील हंगामाच्या पिकाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो.
काही होतात तर शेळ्या-मेंढया लाकार रिंगणात बसवतात, त्याच भागात पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. कुजणाऱ्या शेणात पिकांना घातक ठरणारी बुरशी, मर रोग, मूळकूज, करपा, सड या रोग निर्माण करणार्या बुरशी या शेणात नसाव्यात.
अनेकदा शेतातील निदण्यात येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरले जाते. अशा तणांच्या मुळास तटकतेली शेतातील माती रोगकारक बीजाणूंसह शेणाबरोबर खड्नुयात जाते. त्या ठिकाणी इतर सेंद्रिय पदार्थाबरोबर वाढते. अशा वेळेस शेणखतास जैविक प्रक्रिया करून घेणे आवश्यक ठरते.