Search
Generic filters

सेंद्रिय,नैसर्गिक शेती, तज्ज्ञांनी ज्ञान पाजू नये…!

सेंद्रिय,नैसर्गिक शेती, तज्ज्ञांनी ज्ञान पाजू नये…!

 

एके काळी निसर्गावर केली जाणारी शेती दुष्काळामुळे विदेशी लाल धान्य आयात करून  भूक भागवावी लागली. त्यानंतर देशात हरित क्रांती चे वारे वाहू लागले.त्यात शेतीत यांत्रिकीकरण,रासायनिक खते, हाय ब्रिड बी बियाणे यांचा वापर वाढून उत्पादन वाढले.त्याच बरोबर पिकावर अनेक रोग,किड येऊ लागल्याने बेसुमार किड नाशक,बुरशी नाशक यांचा बेसुमार वापर केला गेला.त्याचा परिणाम नैसर्गिक रीत्या विषमुक्त पिकवले जाणारे अन्न धान्य,भाजीपाला विषयुक्त झाले. त्याचा परिणाम नको त्या आजाराने मानवी जीवन ग्रासले गेले.

 

अती दुष्परिणाम व आजार वाढल्याने पुन्हा नैसर्गिक,सेंद्रिय,जैविक शेतीचे वारे वाहू लागले. त्यासाठी शासन,शेती तज्ञ शेतकऱ्याला सल्ला व मार्गदर्शन करू लागले. गेल्या दोन वर्षांत रासायनिक शेती व नैसर्गिक शेती याचा मला आलेला अनुभव व व्यथा मांडल्या शिवाय सेंद्रिय ,नैसर्गिक,जैविक शेतीचे सत्य समोर येणार नाही.त्याबत फारस कुणी लिहिणार व बोलणार ही नाही.त्यामुळेच शेतकरी नवीन तंत्र,सल्ले,विषमुक्त शेती यात कसा भरडला जातो याचे विवेचन करून वास्तव समोर ठेवण्याचा अल्पसा प्रयत्न.

 

2019/20 रब्बी गहू

नेहमीची रासायनिक पद्धत व्हरायटी..496 पेरणी …2 एकरावर रासायनिक खते,तन नाशक , पोषक , कीडनाशक , बुरशी नाशक फवारणी केली. मशीनने क्लीन केला. उत्पादन…35 क्विंटल मिळाले

 

2020/21 रब्बी गहू

नैसर्गिक पद्धतीने पिकवला व्हारायटी..496 पेरणी ..2 एकरावर च पेरणीला फक्त…Npk दिले. तन नाशक, पोषक , कीडनाशक , बुरशी नाशक जी. ए. संजीवक संप्रेरक कुठलीच फवारणी केली नाही. हार्वेस्टिंग केल्यावर पुन्हा ट्रॅक्टर थ्रेशर ने क्लीन केला. उत्पादन…फक्त 22 क्विंटल मिळाले म्हणजे 13 क्विंटल उत्पादन घटले.. तेही ही मान्य करू…पण नैसर्गिक रीत्या पिकवला म्हणून दोन रुपये जादा मिळेल ही अपेक्षा…. त्यावर ही पाणी ,लोक फक्त गहू विचारतात,बघतात.

औषध फवारणी केलेला,न केलेला याच्याशी काही देणे घेणे नाही.जर विचारल कुणी तर १६ चे पायली पोते म्हणतो.(ना पोते राहिले ना ते उचलण्याची ताकत) मी 4 पायली गहू मोजून नेले,एक व्यापारी बंधुस वजन करून दिले… ते 29 किलो भरले त्यांनी 22 रू किलो प्रमाणे 630 रुपये मला दिले.( 638 होतात वरचे 8 रुपये घेतले नाही) विचार  करा 4 पायली चे 630 रुपये …. मग 16 पायली चे त्याच्या चारपट 630×4=2520 होतात(कारण सोळा पायली चे वजन 116 किलो होते) ग्राहकाने विचारले  त्यांना 22 रू किलो भाव (नैसर्गिक पद्धतीने पिकवला म्हणून) सांगितला ते 16 पायली पोते कितीला विचारतात, 2500 रू.सांगितले की… एव्हढा कुठं भाव हे का ? हे उत्तर येते.

मग त्यात नैसर्गिक,सेंद्रिय हे कुणी विचारत नाही,सांगितले तरी , एकूण फारसा फरक पडत नाही. मग त्या पेक्षा जास्त उत्पादन देणारे वाण करून,रासायनिक औषध फवारणी करून गहू पिकवला आणि तयार झाल्या बरोबर शेतातून च मार्केट वर विक्री केला (क्लीन न करता) ते कधीही चांगले .भले तो 16 रू.किलो ने विकला तरी परवडते कारण तो उत्पादन देतो.क्लीन करण्याची गरज नाही.क्लीन मध्ये 10 टक्के माल बाहेर निघतो. ते नुकसान टळते.

 

तात्पर्य…..

विषमुक्त अन्न,सेंद्रिय शेती ,नैसर्गिक शेती याचे ज्ञान सुज्ञ शेतकऱ्याला कुणी पाजू नये. तेव्हढी किंमत देऊन खरेदी करण्याची  दान त  जे ज्ञान पाजतात त्यांचीच नाही.

शेवटी.. काही प्रामाणिक ग्राहक भेटले , त्यांनी सांगितलेला भाव मान्य केला.नैसर्गिक गहू व माझी ही किंमत त्यांना समजली. त्याची माफी मागून व्यथा पूर्ण करतो.

 

एक शेतकरी..उत्तम पुणे
संपर्क:- 9922827613
शेतकरी,शेती प्रश्नाचे अभ्यासक
दिनाक..1 एप्रिल 2021

1 thought on “सेंद्रिय,नैसर्गिक शेती, तज्ज्ञांनी ज्ञान पाजू नये…!”

  1. Painganga Jevik Sheti Gat Kolwad

    सेंद्रिय शेतीला नियोजन लागते. उत्पादन खर्च कमी होतो. उत्पादन कमी नाही होत.

Leave a Comment

Your email address will not be published.