Search
Generic filters

PM Kisan: सम्मान योजनेसाठी पात्र कोण ठरतंय? कुणाला पैसे मिळत नाही? वाचा सविस्तर

PM Kisan: सम्मान योजनेसाठी पात्र कोण ठरतंय? कुणाला पैसे मिळत नाही? वाचा सविस्तर

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या आवश्यक बाबी वाचल्यानंतरचं अर्ज करणं महत्वाचं आहे.

 

 

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. सरकारनं निर्धारित केलेल्या संख्येसाठी २.७९ कोटी शेतखकऱ्यांची नोंदणी होणं बाकी आहे. जर काही शेतकऱ्यांना नोंदणी करायची असेल तर काही बाबी माहिती असणं आवश्यक आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या आवश्यक बाबी वाचल्यानंतरचं अर्ज करणं महत्वाचं आहे. कारण सरकार सध्या ३३ लाख शेतकऱ्यांकडून पैसे परत घेत आहे.

 

११.७१ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत ११.६६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेनुसार १.१५ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत. केंद्र सरकारचा १४.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ११.७१ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झालीय. चुकीची माहिती भरुन योजनेचा लाभ घेतल्या आधार पडताळणीमध्ये सरकारला ती बाब समजू शकते त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावा. त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

 

हे पण वाचा :- MahaDbt मधील या योजना ९०% अनुदान- Online अर्ज सुरू

 

केंद्रीय कृषी मंत्रालयानेपीएम किसान योजनेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या माहिती असणं आवश्यक आहे. सरकारी अधिकाऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही मात्र, केंद्र आणि राज्य सरकार मधील मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/ड श्रेणीतील कर्मचारी यासाठी पात्र आहेत.

 

पीएम किसान योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही

(१) संविधानिक पदावर असणारा किंवा मंत्री असणारा शेतकरी
(२) नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, विधानपरीषद आमदार, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य
(३) केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकारी
(४) प्राप्तिकर भरणारे शेतकरी
(५) १० हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे शेतकरी
(६) डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकिल

 

पडताळणी अनिवार्य

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माहितीनुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या माहितीचं आधार वेरिफिकेशन (Aadhar verification) अनिवार्य करण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये काही विसंगती आढळल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आवश्यक ते बदल करावेत, असं सुचवण्यात आलं आहे.PM Kisan: सम्मान

 

आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासणार?

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता
तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील….
सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल.

संदर्भ :- tv9 marathi.com

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published.