Search
Generic filters

Pm kisan योजनेचा आठवा हप्ता होळीनंतर मिळणार, 11 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

Pm kisan योजनेचा आठवा हप्ता होळीनंतर मिळणार, 11 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

 

एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून होळी सण झाल्यानंतर एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे. सरकारनं निर्धारित केलेल्या 14.5 कोटींच्या संख्येसाठी 2.74 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी होणं अद्याप बाकी आहे. केंद्र सरकारकडून 11.76 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठवले जाण्याची शक्यता आहे.

 

11.76 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. केंद्र सरकारचा 14.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 11.76 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झालीय.

हे वाचा:- किसान क्रेडिट कार्ड मोफत बनवण्याची सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी सुरु

पीएम किसान सन्मान योजनेमध्ये नोंदणी केली नसल्यास नोंदणी करण्याची संधी आहे. देशभरातील 2.74 कोटी शेतकरी नोंदणी करु शकतात. नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करता येईल. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक वर्षात 6 हजार रुपये पाठवले जातात. शेतकऱ्यांनी जर 31 मार्चपूर्वी नोंदणी केली आणि त्यांचा अर्ज स्वीकारला गेल्यास त्यांना मार्च महिन्याचे 2000 आणि एप्रिल महिन्याचे 2000 असे चार हजार मिळू शकतात.

जम्मू काश्मीर, लडाख, मेघालय, आसामचे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणार असतील तर त्यांच्या राज्य सरकारडून शेतकऱ्यांचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं, असणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डच्या माहितीमध्ये विसंगती आढळून आली त्यांच्याकडून पैसे परत घेण्यात आले आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, यूपी आणि बिहारमधील शेतकऱ्यांच्या आधार कार्डची पडताळणी होणार आहे. जर तुमच्या आधार कार्डवरील माहितीमध्ये चूक असल्यास ती 31 मार्चपूर्वी दुरुस्त करुन घ्या. राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये तुम्हाला आधार कार्डमधील माहिती अपडेट करुन मिळेल.

 

ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

स्टेप 1: पीएम-किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in)वर भेट द्या.
स्टेप 2: तिथे Farmer Corner वर क्लिक करा
स्टेप 3: पुढे NEW FARMER REGISTRATIONवर क्लिक करा.
स्टेप 4: यानंतर पुढील पेज ओपन होईल तिथे आधार कार्ड आणि कॅप्चा टाकून पडताळणी करा
स्टेप 5 : यानंतर पुढे जा वर क्लिक करा
स्टेप 6: पुढे अर्ज ओपन होईल त्यातील माहिती भरा
स्टेप 7: अर्जातील संपूर्ण माहिती बरोबर भरा आणि नोंदणी करा. Pm kisan योजनेचा आठवा

संदर्भ:- TV9 marathi 

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published.