Search
Generic filters

Pm-Kisan yojana: आठव्या हप्त्यासाठी सरकारची काय तयारी? शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पोहचणार पैसे ?

pm kisan yojana

Pm-Kisan yojana: आठव्या हप्त्यासाठी सरकारची काय तयारी? शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पोहचणार पैसे ?

 

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकर्‍यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारकडून 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते.

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान योजनेचा आठव्या हप्त्याची शेतकरी बरीच प्रतीक्षा करत होते. मात्र, याबाबत सरकारकडून कोणतेही निवेदन अद्याप देण्यात आले नाही. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसात यावेळी एकाच वेळी सुमारे 10 कोटी शेतकर्‍यांना 20 हजार कोटी रुपये दिले जातील. मंत्रालयाच्या वतीने सर्व कामे जवळजवळ पूर्ण झाली आहेत. त्याशिवाय कृषी मंत्रालयाने नमूद केले आहे की 24 मार्च 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत पीएम किसान योजनेंतर्गत 63,275.57 कोटी रुपये वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये देण्यात आले आहेत. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकर्‍यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारकडून 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते.

आठव्या हप्त्यासाठी सरकारची काय तयारी?

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी टीव्ही -9 शी खास बातचीत करताना सांगितले की, एप्रिल महिन्याच्या अखेरीस सुमारे 20 ते 25 तारखेपर्यंत सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2-2 हजार रुपयांचा हप्ता जमा होईल. तुम्हीही सरकारच्या नव्या यादीमध्ये आहात की नाही ते घरी बसून तपासले जाऊ शकते. यासाठी सर्वप्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृत संकेतस्थळावर pmkisan.gov.in वर जावे लागेल. तेथे आपल्याला फार्मर कॉर्नर दिसेल. येथे आपण आपले नाव लाभार्थी यादीमध्ये तपासू शकता. लाभार्थी यादीवर क्लिक करताच एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे आपले राज्य, जिल्हा, गट आणि गाव याविषयी पूर्ण माहिती प्रविष्ट करावी लागेल. यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. संपूर्ण यादी आपल्या समोर ओपन होईल. तसेच पंतप्रधान शेतकऱ्यांच्या अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात. ही एक अखंड योजना आहे. बर्‍याच काळापासून शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमुळे लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही चौधरी यानी नमूद केले.

हे पण वाचा:- पंतप्रधान किसान मानधन योजना: दरमहा ५५ रु भरा आणि मिळवा ३००० रु

या क्रमांकावर कॉल केल्याल मिळेल माहिती

लँडलाईन क्रमांक : 011—23381092, 23382401
पीएम किसान सम्मान योजना टॉल फ्री क्रमांक : 18001155266
पीएम किसान योजना हेल्पलाईन क्रमांक : 155261, 0120-6025109

हे पण वाचा:- १० एप्रिल पासून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा अंदाज

आठव्या हफ्त्याबाबत चुकीच्या बातम्या

कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की काही माध्यम संस्था असे लिहित आहेत की 1 एप्रिलपासून आठवा हप्ता येऊ लागला आहे. ही चुकीची बातमी आहे. पैसे अद्याप जाहीर झाले नाहीत. आठव्या हप्त्याच्या बातम्या माध्यमांमधून येण्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देऊ नये.  Pm-Kisan yojana: आठव्या Pm-Kisan yojana: आठव्या

संदर्भ:- Tv9 Marathi

Leave a Comment

Your email address will not be published.