Search
Generic filters

सफरचंद लागवड कशी करावी ?

सफरचंद लागवड कशी करावी ?

सफरचंद लागवड कशी करावी ?

सफरचंद safarchand lagwad mahiti हे एक सर्वत्र मागणी असलेले नगदी पीक आहे. हे जगातलं चौथ्या क्रमांकाचे मोठ्या प्रमाणावर लागवड केले जाणारे फळ आहे. ह्या फळाला बाजारपेठेत बारमाही मागणी असते तसेच याचा बाजारभाव हि जास्त असतो.

जमिनीचा प्रकार 

apple ह्या फळाला लागवडीसाठी चिकट तसेच जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ असणे गरजेचे आहे. तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन या फळाला उपयुक्त आहे.

हवामान

सफरचंदाची लागवड करण्यासाठी तापमान सरासरी २१ ते २४ अंश असणे गरजेचे आहे. ह्या पिकाला चांगली फुल आणि फळ धारणा होण्यासाठी सुमारे १०० ते १२५ सेंटीमीटर पर्जन्यमान असणे आवश्यक आहे.

पिकाची जात

गोल्डन डिलिशिअस, रेड जू, लाल अम्ब्री इत्यादी तसेच हरीमान हि जात महाराष्ट्रात लागवड केली जाते.

लागवड How to plant apple?

सफरचंद या फळाची रोपे कलम करून तयार केली जातात ह्याची लागवड साधारण जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये केली जाते. फळांची जात आणि मातीची क्षमता या वर दोन झाडांमधील अंतर अवलंबून आहे. झाडांची संख्या रोपे लागवडीच्या घनतेवर आधारित आहे.

खत व्यवस्थापन

रासायनिक खतांबरोबर या झाडाला प्रति वर्षी १० किलो शेणखत द्यावे. रासायनिक खतांची मात्रा मातीच्या परिक्षणावर अवलंबून असते तरीही साधारण ३५० ग्रॅम नत्र, १७५ ग्रॅम स्फुरद आणि ३५० ग्रॅम पालाश पूर्ण वाढलेल्या झाडाला दिले जाते. सफरचंद लागवड कशी करावी ?

पाणी व्यवस्थापन

उन्हाळ्यामध्ये झाडाला ७ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. फळ धारणा झाली कि साधारणपणे आठवड्याने झाडाला पाणी द्यावे.

रोग नियंत्रण

वेगवेगळ्या हंगामानुसार या फळावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आढळतो. रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रोग प्रतिकारक अशा जातींचा वापर करावा. या पिकावर कोलार रॉट, अँपल स्कॅब, या सारखे रोग पडतात, या वर मॅनको झेब, कार्बेन्डाझिम असेच इतर बुरशी नाशकांची फवारणी योग्य पद्धतीने घेऊन रोग नियंत्रण करता येते.

उत्पादन

साधारण बहार आल्या नंतर १३० ते १४० दिवसांपर्यंत फळे काढणीस तयार होतात. लागवडी पासून ४ वर्षाने झाडास फळे येण्यास सुरवात होते. एका चांगल्या पद्धतीने जोपासलेल्या झाडापासून साधारण १० ते १२ किलो फळे प्रति वर्षी उपलब्ध होतात.  सफरचंद लागवड कशी करावी ?
संदर्भ:- ओम फलोत्पादन रोपवाटिका फेसबुक

शेती विषयक माहिती pdf

Leave a Comment

Your email address will not be published.