Search
Generic filters

माती,पाणी व पान देठ प्रयोगशाळा

माती,पाणी व पान देठ प्रयोगशाळा

आमच्या प्रयोगशाळा मध्ये खाली परीक्षण करून मिळतील.

 1. माती परीक्षण
 2. पाणी परिक्षण
 3. पान देठ परिक्षण
 4. खते परिक्षण
 5. कृषी सल्ला व मार्गदर्शन

माती परिक्षणाचे का करावे व त्याचे महत्व:-

 • शेती व्यवसायामध्ये सुपीक जमीन अत्यंत  महत्वाची आहे.
 • पीक घेण्यापुर्वी पिकास कोणत्या प्रकारची माती पाहीजे?
 • तसेच त्या मातीमध्ये पिक पोषक द्रव्याचा साठा कितपत आहे..
 • ही सर्व माहीती असणे अत्यंत आवश्यक आहे,
 • म्हणुनच पिकांसाठी माती परीक्षण करणे हे अत्यंत गरजेचे आहे.
 • माती परिक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याणे जमिनीची सुपिकता टिकुन तिची उत्पादनक्षमता वाढते.
 • प्रमाणशिर खतांची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते.
 • जमिनीचा सामु व क्षारता या गुणधर्माच्या मुल्यमापावरुन क्षारयुक्त किंवा खार जमिनीबाबत कल्पना येऊन त्यानुसार सुधारणा करता येते.
 • जमिनीच्या प्रतिनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.
 • उपलब्ध खतांचा पुरेपुर फायदा घेता येतो.

 माती परिक्षण दरवर्षी का करावे

 1. वर्षातुन दोन ते तीन वेळा पिके घेतल्यास मातीचा नमुना दर वर्षी घेणे आवश्यक असते.
 2. नत्र  या अन्नद्रव्याचे जमिनीतील प्रमाण दर वर्षी बदलत असल्यामुळे नत्राचे प्रमाण तपासण्यासाठी मातीचा नमुना दरवर्षी घ्यावा.

 मातीचा नमुना कसा घ्यावा 

मातीचा रंग,उंच सखलपणा, हलकी, भारी, कोरडवाहू, सिंचणाची, जमिनीची खोली, पाण्याचा निचर्याची परिस्थिती तसेच क्षारयुक्त किंवा चोपण इत्यादी  सर्व बाबी विचारात घेऊन शेतात भाग करावेत.

 1. खतांच्या शिफारशीसाठी मातीच्या नमुण्याची खोली  किती असावी हे ठरविताना पिके जमिनीच्या कोणत्या थरातुन अन्नद्रव्ये शोषण करतात हा  मुद्दा विचारात घेतला जातो.
 2. हंगामी पिक: (ज्वारी, भात, गहु, भुईमुग):  १५ ते २० से.मी.
 3. बागायती पिके (ऊस, केळी इ.): ३० से.मी. 
 4. फळ पिके -६० से.मी.
 5. मातीचा नमुना पिके काढल्या नंतर खते देण्यापुर्वी एका लाकडाच्या खुर्याच्या सहाय्याने घ्यावा.
 6. एका क्षेत्रातुन सात ते आठ ठिकाणी खड्डे घ्यावेत.
 7. पिकांच्या मुळांच्या विस्तारानुसार १५-४५ से.मी. खोलीचे “V” आकाराचे खड्डे तयार करावे.
 8. खड्ड्याच्या एका बाजुला पृष्ठभागापासुन खालपर्यंत सारख्या जाडीच्या मातीचा थर‌ घ्यावा.
 9. प्रत्येक ठिकाणाहून साधारणत: अर्ध्या किलो मातीचा  नमुना स्वच्छ घमेल्यात जमा करावा.
 10. मातीसोबत आलेला काडी, कचरा, दगड काढुन ती चांगली मिसळुन घ्यावी. नंतर  मातीचे सारखे  चार भाग पाडावेत.
 11. समोरासमोरील कोणतेही दोन भाग घेऊन परत माती  एकत्र मिसळावी असे शेवटी अंदाजे अर्धा किलो माती  मिळेपर्यंत करावे व तो प्रतिनिधीक नमुना म्हणुन एक स्वछ कापडाच्या पिशवीत भरावी  व नमुना परिक्षणास पाठवावा.

 कोणता माती नमुना घेऊ नये:

 • झाडाखालच्या,पाटाच्या कडेचा,शेतबांधाच्या कडेचा,खताच्या ढिगाखालचा,जनावरे बांधलेल्या जागेचा,ओल्या मातीचा  नमुना घेऊ नये.

माती नमुन्यासोबत पाठवायची माहिती

 1. शेतकर्याचे संपुर्ण नांव व पत्ता
 2. नमुना घेतल्याची तारीख.
 3. सर्व्हे नंबर/गट नंबर/शेताचे नाव
 4. मागील हंगामातील पिक व जात
 5. पुढील हंगामातील पिक व जात बागायती/कोरडवाहु
 6. बागायती असेल तर सिंचनातील साधन  (विहीर/ट्युबवेल/कॅनल)
 7. जमिनीची खोली (उथळ/मध्यम/खोल)
 8. पाण्याचा निचरा-चांगला/बरा/वाइट
 9. जमिनीचा प्रकार(हलकी/मध्यम/सपाट)

ASP लॅबोरेटरिज अॅण्ड अॅग्रो सोल्युशन्स

8380086488 / 8446060488

 

1 thought on “माती,पाणी व पान देठ प्रयोगशाळा”

Leave a Comment

Your email address will not be published.