‘वीज तोडणी तात्काळ थांबवा’ , विधानसभेत वीजबिलाबाबत अजित पवारांची महत्वाची घोषणा
वाढीव वीजबिलावरुन राज्यभरात भाजपनं आंदोलन केल्यानंतर आज विधिमंडळात देखील ते आक्रमक झाले. भाजप आक्रमक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी तात्काळ थांबवा असे आदेश दिले आहेत.
अजित पवार म्हणाले की, जोवर विजेच्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.
वाचा :- महावितरणची मोहीम: कृषी ग्राहकांपर्यंत जास्त फायदा पोहोचवण्यासाठी राबवणार कृषी ऊर्जा पर्व
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी याबाबत नियम ५७ अन्वये मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभेत वीजबिलावरुन भाजप आक्रमक, बॅनर घेऊन सदस्य वेलमध्ये उतरले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वीज बिलावर चर्चा करावी. इतर सर्व विषय बाजूला ठेवावे. या विषयावर चर्चा व्हावी अशीच आमची भूमिका आहे, असं फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दोन्ही बाजूच्या सभासदांचे समाधान झाल्यावर वीजेबाबत निर्णय होईल. वीज तोडण्यात येणार नाही. वीज कनेक्शन बाबत चर्चा करण्याची तयारी आहे, असं ते म्हणाले.