शेतकऱ्यांची रब्बीची चिंता मिटली. Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information


शेतकऱ्यांची रब्बीची चिंता मिटली.

24-11-2022

...

शेतकऱ्यांची रब्बीची चिंता मिटली.

 

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी अडचणीत आला. या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील झाली. या पावसामुळे राज्यातील नद्या ओढे धरणे फुल झाली. असे असताना आता अजूनही काही धरणे शंभर टक्के आहेत.

मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे यावेळी मराठवाड्यातील धरणे तुडुंब भरली असल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्यातील मोठी धरणे अजूनही शंभर टक्के भरलेली आहेत. यामुळे उन्हाळ्यात पाण्याची चिंता मिटली आहे.

याचा रब्बी खरीपातील पिकांना मोठा फायदा होणार असून, शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. खरीप पिकांचे नुकसान झाले असले तरीही मात्र रब्बीत मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

शेवटच्या टप्प्यात रब्बीच्या पिकांना अनेकदा पाण्याची कमतरता भासल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होत असतो. मात्र यंदा धरणे भरलेली असल्याने पिकांना शेवटपर्यंत पाणी पुरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोठ्या धरणांपैकी एक असलेले जायकवाडी धरण अजूनही 100 टक्के भरलेले आहे. यामुळे चिंता मिटली आहे. जायकवाडी धरणाच्या मुख्य दरवाज्यातून यावर्षी तीन वेळा पाणी सोडण्यात आले. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

source: कृषी जागरण

rabis worries farmers solved, dams still one hundred percent, biggest dam full