बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

  ॲप

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Krantiमुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना

24-05-2023


मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना

वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन.

लाभार्थी पात्रता :-

  1. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक.
  2. अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक
  3. अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भाडा खावरातील छोटी किंवा इतर कुठल्याही शासकिय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थी निवड :-

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकिय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ देण्यात येईल.

शेततळ्यासाठी आकारमान :-

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल मर्यादा रुपये 15000/- अक्षरी रुपये पंचाहत्तर हजार फक्त रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. तपशिल पुढील प्रमाणे.

शेततळ्याच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाचा रक्कम वरील अ व ब तक्त्यामध्ये नमुद केल्यानुसार निश्चीत करण्यात आली आहे. तथापि देय अनुदानाची कमाल रक्कम रुपये 75000/- इतकी राहील. रक्कम रुपये 75000/- पेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरिक्त खर्च संबधित लाभार्थ्यांने स्वतःकरणे अनिवार्य राहील.

अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

तक्ता - अ (यंत्राद्वारे इनलेट आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅपसह शेततळे)
अ.क्र.आकारमान (मीटरमध्ये)बाजू उतार (१:१) बाजू उतार (१:१:५) (काळया मातीमध्ये) 
  सर्वसाधारण क्षेत्र डोंगराळ क्षेत्रआदिवासी उपयोजना व क्षेत्र डोंगराळ क्षेत्रसर्वसाधारण क्षेत्र डोंगराळ क्षेत्रआदिवासी उपयोजना व क्षेत्र डोंगराळ क्षेत्र
115x15x323881260101969321492
220x15x332034348212679929774
320xd20x343678473983739540621
425x20x355321599744799152068
525x25x370455750006207867280
630x25x375000750007500075000
730x30x375000750007500075000
834x34x375000750007500075000
तक्ता ब (यंत्राद्वारे इनलेट आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रेपविरहित शेततळे)
अ.क्र.आकारमान (मीटरमध्ये)बाजू उतार (१:१) बाजू उतार (१:१:५) (काळया मातीमध्ये) 
  सर्वसाधारण क्षेत्र डोंगराळ क्षेत्रआदिवासी उपयोजना व क्षेत्र डोंगराळ क्षेत्रसर्वसाधारण क्षेत्र डोंगराळ क्षेत्रआदिवासी उपयोजना व क्षेत्र डोंगराळ क्षेत्र
115x15x318621202351443315717
220x15x326774290462153923399
320x20x338417416233213534846
425x25x350061541994273146293
525x25x365194705405681861505
630x25x375000750007090475000
730x30x375000750007500075000
834x34x375000750007500075000

 

अर्ज सादर करण्याची पद्धत :-

  • महा डीबीटी पोर्टलचे http:/mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. 
  • शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र CSC ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील..

source : krushi vibhag maharashtra


 

Sainchan Yojana, shettale Yojana, Sarkari Yojana, sheti yojana


शेअर करा

खात्रीशीर जाहिराती