बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

  ॲप

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti







स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

24-05-2023


स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाही त्याकरीता हि योजना लागू.

पात्र लाभार्थी

  1.  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करिता पात्र ठरु शकत नाही असे वैयक्तीक शेतकरी.
  2. स्वतः च्या नावे ७/१२ आवश्यक ७ / १२ नसल्यास संमतीपत्र.

लाभ क्षेत्र मर्यादा

  1. किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर
  2. कमाल मर्यादित लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करु शकेल.
  3. म.ग्रा.रो.ह.यो. मध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ २ हेक्टर क्षेत्रापर्यंत घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी या योजनेमधुन लाभ घेता येईल.
  4.  यापुर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड व अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्र मर्यादित लाभार्थी पात्र राहील.

समाविष्ट पिके-         १६ बहुवार्षिक फळपिके.

आंबा, पेरु, मोसंबी, कागदी लिंबु, संत्रा, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, फणस, चिकू.

अनुदान :

खड्डे खोदणे, कालमे / रोपे लागवड, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक द्वारे पाणी इत्यादीसाठी १०० टक्के राज्य शासन.

अर्ज ऑनलाईन करण्यासाठी संकेतस्थळ :

https://mahadbtmhait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना पर्याय निवडुन ऑनलाईन पध्दतीने अर्जाची नोंदणी करावी. 

खालील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहेत.

  1. ७ / १२, नमुना ८ अ,  
  2. आधार कार्ड, 
  3. बँक पासबुक झेरॉक्स.

source : krushi vibhag maharashtra

Orchard planting, falabag yojana,


शेअर करा

खात्रीशीर जाहिराती