‘ठिबक’ साठी ऑनलाईन अर्ज करण्यास

‘ठिबक’ साठी ऑनलाईन अर्ज करण्यास नऊ दिवसाची मुदतवाढ

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून ठिंबक सिंचनचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नऊ दिवसाची मुदतवाढ करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारी अंतिम तारीख होती. मात्र गेल्या चार दिवसापासून संकेस्थळ सातत्याने बंद पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता येत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन ती तारीख २९ फेब्रुवारीपर्यत वाढवण्यात आली आहे.‘ठिबक’ साठी

राज्यातील बहूतांश भागात गेल्या पाच वर्षापासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे. मात्र अशाही परिस्थितीत ठिंबक, तुषार सिंचनाचा वापर करत असलेल्या शेतकरयांना कमी पाण्याच्या वापरातून फळपिके जगवता आली. काही भागात ठिबकमुळे कमी पाण्यावर शेती यशस्वी करता आली. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करावा यासाठी सरकारचे प्रयत्न असून ठिंबकसाठी केंद्र सरकार ५५ टक्के व राज्य सरकार २५ टक्के अनुदान देत आहे. दोन वर्षापासून शेतकरी ठिंबक, तुषार सिंचनचा कृषी विभागाकडून अनुदानावर लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत.

आतापर्यत नगर जिल्ह्यामध्ये ४२ हजार शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनची ऑनलाईन अर्ज करुन मागणी केली आहे. मात्र गेल्या चार दिवसापासून संकेस्थळ सातत्याने बंद पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता येत नव्हते. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नऊ दिवसाची मुदत वाढवण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱयांनी ठिंबकसाठी अर्ज करावेत असे आवाहन नगरचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजाराव जगताप यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *