पशुपालकांसाठी खुश खबर किसान क्रेडीट कार्डावर आता शेळ्याही घ्या

पशुपालकांसाठी खुश खबर : किसान क्रेडीट कार्डावर आता शेळ्याही घ्या

 

औरंगाबाद – किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीच्या गरजा भागवत आहेत. मात्र या किसान क्रेडिट कार्डात पशुसंवर्धनविषयक गरजांचा समावेश नव्हता. आता नाबार्ड आणि रिझर्व्ह बॅंकांनी पशुपालनविषयक आवश्यक गरजा भागवण्यासाठी या कार्डाचा वापर करता येईल, असेल स्पष्ट केले आहे. यामुळे पशुधन वाढ व दूध उत्पादनवाढीसाठी फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावेत, शेतकरी सावकाराच्या पाशातून सुटावेत याच हेतूने सरकारतर्फे प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्डची सुविधा देण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगालाही पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. यात तीन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज, तर उर्वरित दोन लाखांच्या रकमेतून शेतीपूरक उद्योगातील कोंबडीपालन, मत्स्यव्यवसाय आदींसाठी कर्ज घेता येते.
जिल्हा बँकेत प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत ९१ हजार २६८ लाभार्थी असून, त्यातील २८ हजार १० शेतकरी कार्डचा लाभ घेतात. एक ते तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने घेता येणार आहे. तर एक लाख रुपयांचे कर्ज वेळेत फेड केली तर त्यावर कसलेही व्याज आकारले जाणार नाही.

उर्वरित दोन लाखांमधून कोंबडी, मत्स्यव्यवसाय आदी शेतीपूरक उद्योगांसाठी कर्ज घेता येते. मात्र यामध्ये पशुविषयक गरजा भागवण्यासाठी किसान कार्डाचा लाभ घेता येत नव्हता.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे यांनी सांगितले, की आतापर्यंत किसान क्रेडिट कार्डाचा वापर कृषीविषयक बाबींसाठी केला जात होता; मात्र पशुसंवर्धनविषयक बाबीसाठी हे कार्ड वापरता येत नव्हते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डने पशुधनविषयक आवश्यक गरजा भागवण्यासाठी, पशुसंवर्धनापासून शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठी किसान क्रेडिट कार्डचे विस्तारीकरण करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

कृषीक्रांतीवर करा शेतीसंबंधित मोफत जाहिरात खालील लिंकवर जाऊन जाहिरात टाका 

https://www.krushikranti.com/publish-advertisement/

त्या अनुषंगाने गेल्या महिन्यात राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून यासंदर्भात परिपत्रक काढून याबाबत कळवले आहे. यामुळे आता किसान क्रेडिट कार्डाआधारे पशुपालकांनाही योजनेचा लाभ घेता येईल. शेळी गट खरेदी, बैलजोडी खरेदी, दुधाळ जनावरांची खरेदी तसेच दूध प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री घेण्यासाठी या कार्डाद्वारे अडीनडीला अल्पमुदतीचे कर्ज घेता येईल.
पशुपालकांनी बँकेमध्ये किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा. अडचणी असतील तर त्यांनी पशुसंवर्धन दवाखाना येथे क्षेत्रीय पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.

दुग्धव्यवसायाला मदत
पशुसंवर्धन सभापती एल. जी. गायकवाड यांन सांगितले, की आता पशुपालकांना दुग्ध व्यवसाय व पशुधन वाढवण्यासाठी मदत होणार आहे. डीबीटीच्या अनेक योजनांमध्ये लाभार्थी या कार्डाच्या आधारे स्वहिस्सा भरून त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील.पशुपालकांसाठी खुश

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

 

Ref:- esakal.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *