चिंच लागवड

 
चिंच हे पीक विविध हवामान तसेच जमिनीत घेता येते .तामिळनाडू, कर्नाटक, केरळ राज्यांत चिंचेचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. महाराष्ट्रात चिंचेला चांगला बाजार आहे.चिंच या पिकाचा वापर विविध पद्धतीने केला जातो आणि एकदा लावलेले रोप अनेक वर्ष उत्पन्न देते .
 
जमिनीचा प्रकार
चिंच हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते.जसे कि काळ्या ,भुसभुशीत, रेताड वाळू मिश्रित,कोरड्या आणि डोंगर उतारावर देखील हे पीक घेता येते.
 
हवामान
समुद्रसपाटीपासून ६०० मीटरपर्यांच्या उंच प्रदेशात चिंच वृक्ष येतो. जास्तीत जास्त ४५ डिग्री सेंटीग्रेट तापमान असलेल्या प्रदेशातही चिंच येतो. ७५० पासून १२५० मि. मी. पाऊस पडणाऱ्या प्रदेशात याची वाढ चांगली होते.कमी पावसाच्या प्रदेशात हि हे पीक घेता येते.
 
पिकाची जात
लागवडीसाठी प्रतिष्ठान, अकोला स्मृती, अजंठा गोडचिंच या जाती निवडाव्यात
 
लागवड
एक किलो वजनात १३०० ते १८०० चिंचोके येतात येतात. त्यांची ७०० रोपे तयार होतात. रोपवाटीकेसाठी मार्च-एप्रिल महिन्यात गादी वाफे तयार करावेत. या गादीवाफ्यात ताजे बी पेरावे. बिया लावताना त्यावर कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नसते. परंतु उकळून थंड केलेल्या पाण्यात २४ तास चिंचोके ठेवल्यास ते चांगले रुजतात.रोप तयार होण्यासाठी साधारण १ महिन्याचा कालावधी लागतो .त्यानंतर हि रोपे पॉलिथीनच्या बॅगेत लावावी .त्या नंतर पावसाळ्या मध्ये हि रोप आपण जमिनीत लावू शकतो लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर 1 मी. x 1 मी. x 1 मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये तळाला पालापाचोळा, एक पाटी चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा.साधारणतः १०/१२ वर्षात चिंच फुलायला व फळायला लागतो.
 
खत व्यवस्थापन
खड्डा भरताना त्यामध्ये तळाला पालापाचोळा टाकून १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत + पोयटा माती व १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + १०० ग्रॅम यांच्या मिश्रणाने भरावा. पूर्ण वाढलेल्या झाडास ( ५ वर्षानंतर) ५० किलो शेणखत व ५०० : २५० : २५० ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड द्यावे.
 
पाणी व्यवस्थापन
हे पीक कमी पाण्या मध्ये हि घेता येते.रोपवाटिकेत रोप तयार करताना नियमित पाणी द्यावे.त्या नंतर जमीन आणि पाण्याची उपलब्धता या नुसार पाण्याचे नियोजन करावे .
 
रोग नियंत्रण
चिंचे वर अनेक प्रकारचे रोग आणि कीटक यांचा प्रदुर्भाव होऊ शकतो.त्या मूळे प्रतिबंधात्मक उपाय योजना कधी हि चांगल्या या साठी रासायनिक खतांपेखा कडूलिंबापासून बनवलेली चांगली औषधे बाजारात आली आहेत. तसेच कीड व रोगांवर सल्फरडस्ट, कॅरथिन, कँलक्सीन ही प्रतिबंधक औषधे उपयोगी पडतात.
 
उत्पादन
सर्वसाधारणपणे १० वर्षापासून चांगले उत्पादन मिळते. ५० ते १५० किलो प्रति झाड
 

Post Views: 483 views

कृषी क्रांती चे जिल्हा निहाय WhatsApp Groups

आपल्याच जिल्ह्यालाच जोडले जा.

खात्रीशीर जाहिराती

नवीन जाहिराती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *