सावधान…बाजारात बीजी-३ अनधिकृ त कपाशीचे बियाणे!

सावधान…बाजारात बीजी-३ अनधिकृ त कपाशीचे बियाणे!

 

गुजरात राज्यातून बीजी-३ कपाशी बियाण्याचे पाकीट या राज्यात आले असल्याचे खात्रीलायक सूत्राने सांगितले आहे.

राज्यात बीजी-३ कपाशीचे अनधिकृ त बियाणे आले असून, हे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहेत. त्यामुळे अधिकृ त बियाणे विक्रेत्याकडूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करण्याची गरज आहे.
कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत तीन ते चार वर्षांपासून मे महिन्याच्या आत बियाणे बाजारात आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर्षीही मे महिन्यात शेतकºयांना कपाशी बियाणे मिळणार आहेत; परंतु मान्सूनपूर्व कपाशी पेरणी करणाºया शेतकºयांची संख्या वाढली आहे. गतवर्षी परतीचा पाऊस नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापर्यंत होता. त्यामुळे यावर्षी मान्सूनपूर्व कपाशी पेरणाºया शेतकºयांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हेच हेरून यावर्षी गुजरात राज्यातून बीजी-३ कपाशी बियाण्याचे पाकीट या राज्यात आले असल्याचे खात्रीलायक सूत्राने सांगितले आहे. बीटी कपाशी बियाणे भारतात आणणाºया कंपनीने बीजी-३ आणि ४ हे तंत्रज्ञान चाचणी घेण्यासाठीची परवानगी शासनाला मागितलेली आहे. तथापि, त्यांना अद्याप यासाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र किंवा चाचणी घेण्यास परवानगी शासनाने दिलेली नाही. असे असतानाही बीजी-३ चे बियाणे शेतकºयांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या बियाण्याची उगवण क्षमता, उत्पादन याबाबत येथील कृ षी शास्त्रज्ञ, कृ षी विभागाकडे कोणतीही माहिती नाही, हे विशेष. तरीही शेतकºयांच्या माथी हे बियाणे मारले जात आहे. शेतकºयांनीच आता खबरदारी घेण्याची गरज आहे.

बीजी-३ कपाशी बियाणे विक्रीस प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा कृ षी निरीक्षकांसोबत आॅनलाइन बैठक सुरू आहे. लवकरच त्यांना दिशानिर्देश देण्यात येतील.
– नरेंद्र बारापात्रे,
विभागीय संचालक,
गुण नियंत्रण, अमरावती.

 

Ref:- lokmat.com

https://www.santsahitya.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *