काकडी लागवड 

काकडी लागवड 

 

पिकाची माहिती
काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अतिपर्जन्‍याच्‍या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्‍यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्‍ये दररोज उपयोग होतो. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते.काकडी पासून लोणचे, सॅलेड, कोशिंबीर असे बनविले जाते.या पिकाला वर्षभर मागणी असते. भारतामध्ये खानदेश, विदर्भ, नंदुरबार, मराठवाडा, मद्रास, ओरिसा, कर्नाटक या भागांमध्ये काकडीची मुखतः लागवड केल्या जाते.

जमिनीचा प्रकार
पाण्याचा उत्तम निचरा होणारी माध्यम,काळी जमीन यासाठी योग्य असते.

हवामान
काकडी हे उष्‍ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे.

पिकाची जात
शाईन, हिमांगी, फुले शुभागी, मालिनी, शीतल वाण, पुना खिरा, प्रिया, पुसा संयोग

लागवड

बीजप्रक्रिया : प्रथम प्रतिकिलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवून त्यानंतर प्रति 10 किलो बियाणास रायझोबियम जीवाणू संवर्धकाची 250 ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे.पिकाकरीता हेक्‍टरी 2.5 ते 4 किलो बियाणे लागते. लागवडी च्या वेळी खोल नांगरट करून घावी त्यामध्ये कुजलेले शेणखत ३० ते ४० गाड्या शेणखत टाकावे व बेड अथवा सारी वर १ ते १.५ मीटर अंतरावर एका ठिकाणी २ बिया रोवून लागवड करावी तसेच लागवड करते वेळी बुरशीनाशक (बाविस्टीन ) जमिनीत ड्रिचिंग करावे नंतर लागवड करावी.

खत व्यवस्थापन
लागवड करण्यापूर्वी जमिनी मध्ये ५० किलो नत्र, ५०किलो स्फुरद, ५० किलो पालाश लागवडी च्या आधी दयावे. नंतर १९:१९:१९ हे खत ८ लागवड झाल्यावर साधारण १० दिवसांनी दयावे (८ दिवस) म्हणजे वेलीची वाढ चांगले होईल नंतर ५० किलोचा दुसरा हप्ता( ३० ते ४५ दिवसानी ) दयावा.

पाणी व्यवस्थापन
या पिकाला पाणी पावसाळ्यात ८ ते १० दिवसानी, हिवाळ्यात ४ ते ५ दिवसानी व उन्हाळ्यात २ ते ३ दिवसानी जमिनीच्या मगदूरा नुसार पाणी दयावे.

रोग नियंत्रण

किडी – १) मावा – पानातील रस शोषण करतो त्यामुळे वेली निस्तेज होते पिकाची वाढ खुंटते.

उपाय – १) टाटा माणिक – ८ ते १० ग्राम १५ लिटर च्या पंप ला घेऊन फवारणी करावी. अथवा निमार्क २५ -३० गरम १५ लिटर च्या पंप ला घेऊन फवारणी करावी.

२) तुडतुडे – पानातील रस शोषण करते. उपाय – अरे ८ ते १० गरम १५ लिटर च्या पंप ला घेऊन फवारणी करावी.अथवा निमार्क २५ -३० गरम १५ लिटर च्या पंप ला घेऊन फवारणी करावी.

3) सफेद माशी-पानातील रस शोषण करते.पाय – उलाला ८ ते १० गरम १५ लिटर च्या पंप ला घेऊन फवारणी करावी.

४)पाने खाणारी अळी व फळातील अळी – पाने खाते व फळाच्या आत मध्ये अळी तयार होते त्यामुळे फळ वाकडे होते. उपाय – निमार्क २५ -३० गरम १५ लिटर च्या पंप ला घेऊन फवारणी करावी व किडलेली फळे काढून टाकावी नंतर फवारणी करावी. रोग – मर रोग- पाणी जास्त दिलेल्या मुळे किंवा वातावरणातील बदलामुळे रोपाची मर होते.

उपाय – १) पिकाचा आवश्यक्ते नुसार पाणी दयावे तसेच रोपाच्या बुडा जवळ बुरशीनाशकाचे ड्रिचिंग करावे किंवा फवारणी करणे.

उत्पादन
फळाची काढणी ही फळे कोवळी असतानाच करावी म्हणजे मार्केटला चांगला बाजार भाव मिळतो. बी टोकल्यापासून साधारणत: ३० – ४० दिवसांत फळे येतात. दर २ -४ दिवासांनी तोडणी करावी. सरासरी उत्पादन २०० ते ४०० क्वीटल मिळते.

santsahitya.in

Post Views: 383 views

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *