ड्रॅगन फ्रुट लागवड

ड्रॅगन फ्रुट

पीक

Dragon Fruit / ड्रॅगन फ्रुट

पिकाची माहिती
सध्या तरी भारतात मोठय़ा प्रमाणावर लागवड होत नसल्याने श्रीलंका व चीनमधून आयात केले जाते. हे फळ वर्षभर उपलब्ध असते. पारंपरिक पिकांशिवाय विशिष्ट वनस्पतीसुद्धा शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळवून देवू शकतात,याचे हे चांगले उदाहरण आहे.याची भारत मध्ये देखील खूप मागणी आहेआणि त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

जमिनीचा प्रकार
कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकणारी ही वनस्पती आहे.परंतु पाण्याचा निचरा होणाऱ्या मुरमाड व हलक्‍या प्रतीच्या जमिनीत चांगली वाढ होते.फळांच्या चांगल्या प्रतीसाठी पाण्याचा निचरा होणे हि बाब अत्यंत आवश्यक आहे.


हवामान
ही वनस्पती मध्यम पाऊस असणार्‍या कोरड्या हवामानात वाढते.अतिपाऊस व अतिथंड हवामानात तिची वाढ होत नाही. ३५ ते ४० अंश सेल्सिअसपुढे तापमान गेल्यास ‘सनबर्न’चा धोका असल्याने सावली किंवा फॉगर्स किंवा पाण्याची फवारणी यासारखे उपाय घ्यावे लागतात.


पिकाची जात
हायलोसेरास -ह्याचा बाहेरील रंग लाल असतो आणि गर सफेद रंगाचा असतो.


लागवड
‘ड्रॅगन फ्रुट’ची लागवड १४ बाय ७ फूट अंतरावर करतात.लागवडीसाठी काही ठिकाणी या फळपिकाची रोपे ५० ते ६० रुपये या भावाने विकत मिळतात.हे पीक निवडुंगाच्या प्रकारातील असल्याने त्याला आधार देण्यासाठी एकरी ४०० याप्रमाणे सिमेंटचे खांब उभे करावे लागतात.कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या खांबांचा वेलींना आधार द्यावा लागतो.त्यासाठी मातीचे ढीग तयार करून खांबाच्या जवळ ‘ड्रॅगन फ्रूट’ च्या एकावेळी चार बाजूस चार रोपांची लागवड करतात.पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक ढीग हा सुमारे तीन फूट उंचीचा करून घेतात.एकाच ओळीतील प्रत्येक खांबावरून लोखंडी तार ओढून मांडव तयार करतात.


खत व्यवस्थापन
लागवड करतेवेळी प्रत्येक सिमेंटच्या खांबाभोवती एक पाटी चांगले कुजलेले शेणखत घालतात.एक वर्षानंतर फळधारणा झाल्यानंतर प्रतिझाड २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट,२०० ग्रॅम पोटॅश, १०० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य व ५० ग्रॅम सिलिकॉनची मात्रा देतात.फळांचा बहार धरण्यासाठी वर्षातून एकच वेळा हि मात्रा द्यावी लागते.


पाणी व्यवस्थापन
पावसाळ्याव्यतिरिक्त प्रतिझाड आठ लिटर पाणी लागते.उन्हाळ्यात किंवा फळधारणा अवस्थेत ही गरज वाढते. ठिबकद्वारे केवळ चारच तास पाणी दिले तर सुमारे एक किलो वजनाचे एक फळ मिळते.पाणी कमी असेल तर फळांचे वजन कमी होते. निवडुंग वर्गीय वनस्पती असल्याने ‘ड्रॅगन फ्रुट’ ची बाग पाण्यावाचून जळून जात नाही.पाणी नसेल तरीही ‘ड्रॅगन फ्रुट’ चा बहार धरता येतो.


रोग नियंत्रण
‘ड्रॅगन फ्रुट’ वर डाळिंबावरील ‘तेल्या’ सारखा रोग पडतो. त्यामुळे त्याची पाने सडतात. साधारण पणेउन्हाळ्यातच या रोगाचा प्रादूर्भाव होतो.अतिपाऊस व पाण्यामुळे फळकुज होऊ शकते.त्याचप्रमाणे झेंटोमोनस कॉम्पेट्रिस या बुरशीमुळे ही वनस्पती ‘मर’ रोगाला बळी पडते.

फळ बहराच्या काळात बुरशीजन्य व कीडनाशक औषधांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या दर पंधरा दिवसांतून एकदा कराव्या लागतात.बाकी वर्षभर कोणतीही फवारणी करावी लागत नाही.


उत्पादन
ड्रॅगन फ्रुट’ च्या प्रत्येक झाडापासून सुमारे ३० ते ३५ किलो, तर एकरी सुमारे १५ ते १८ टन फळे निघतात.मोठ्या बाजारपेठेत प्रति किलो २०० ते २५० रुपये इतका भाव मिळतो.

santsahitya.i

कृषी क्रांती चे जिल्हा निहाय WhatsApp Groups

आपल्याच जिल्ह्यालाच जोडले जा.

खात्रीशीर जाहिराती

नवीन जाहिराती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *