काय आहेत शेतकरी संघटनाच्या मागण्या वाचा सविस्तर

काय आहेत शेतकरी संघटनाच्या मागण्या वाचा सविस्तर

काय आहेत शेतकरी संघटनाच्या मागण्या वाचा सविस्तर

 

देशात शेतकरी संघटना नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत आहेत. सरकारकडून याबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने शेतक री संघटना आणखी आक्रमक झाल्या आहेत.

 

देशभरात आंदोलन

 

संपूर्ण देशभरात 5 डिसेंबरला आंदोलन करण्यात येणार आहे. पंजाबमधील खेळाडू 7 डिसेंबरला पुरस्कार वापसी करणार आहेत. अन्य खेळाडू आणि कलाकारांनीही पुरस्कार वापसी करण्याचे आवाहन केले आहे.

WWE सुपरस्टार द ग्रेट खली आता दिल्ली एनसीआरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात उतरला आहे.

 

सरकारसमोर शेतकऱ्यांनी ठेवल्या या अटी

कृषी कायदे रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शेतकरी संघटनांनी बुधवारी केली.

आंदोलन देशव्यापी आणि आणखी तीव्र करण्याचा इशाराही संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिल्ली हरियाणाच्या सिंधू सीमेवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

कांदा पिकावरील रोगांचे नियंत्रण कसे कराल

शेतकऱ्यांच्या मागण्या

 

1. तिन्ही कृषी कायदे त्वरित मागे घेण्यात यावे.

 

2. शेतकऱ्यांसाठी एपीएमसीला कायदेशीर मान्यता देण्यात यावी.

 

3. एमएसपी लागू करण्यासाठी स्वामिनाथन फॉर्म्युला लागू करण्याची मागणी.

 

4. एनसीआर विभागात वायू प्रदूषण कायद्यातील बदल मागे घेण्यात यावेत.

 

5. शेतीसाठी लागणाऱ्या डिझेल च्या दारात 50%सवलत देण्यात यावी.

 

6. देशभरात शेतकरी नेते ,कवी ,वकिल व अन्य कार्यकर्त्यांवर जे खटले आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावेत.

शेतकऱ्यांचा आक्षेप

 

शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्यावर 39 आक्षेप केंद्रीय मंत्र्यांसमोर नोंदवले आहे.यामधील 8 आक्षेपावर पुनर्विचार करण्याची व दुरुस्ती करण्याची तयारी मंत्र्यांनी दाखवली आहे.

 

शेतकऱ्यांचे आक्षेप मान्य असतील तर कायदे रद्द करण्याची मागणीही मान्य करावी असे शेतकारी नेत्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

काय आहेत

https://www.santsahitya.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व