नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प-

सरकारी प्रकल्प


विदर्भ व मराठवाड्यातील हवामान बदलास अती संवेदनक्षम ठरणारी 4210 दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पुर्णा नदीचे खोरे यातील खारपाण पट्यातील 932 गावे या प्रकल्पात निवडण्यात आलेली आहेत. यामध्ये राज्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश आहे (औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बुलढाना, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ,वर्धा, व जळगाव ). या गावांमध्ये 6 वर्ष कालावाधीत जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने रु.4000 कोटी अन्दाजीत खर्चाचा हवामान अनुकूल कृषी विकास प्रकल्प राबविण्यास शासनाने 2017 मध्ये मान्यता दिलेली आहे.

या गावांचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणेस प्रकल्प यंत्रणेस सहाय्य करणे,या आराखड्यास ग्राम सभेची मान्यता घेणे तसेच मंजूर वार्षिक कृती आराखड्या नुसार घटकांची अंमल बजावणी करणे, पात्र लाभार्थी यांची संबंधीत घटकांच्या लाभासाठी निवड करणे यासाठी प्रकल्पांतर्गत समाविष्ट गावांच्या प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1959(49) अन्वये ग्राम सभेद्वारे ग्राम कृषी संजीवनी स्थापन करण्यात येते. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे सरपंच तर सदस्य सचिव हे ग्रामसेवक असतात. कृषी संजीवनी समितीचे आर्थिक व्यवहार व प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सरपंच व कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यात येते.

या प्रकल्पा मध्ये शेतकरी यांचेसाठी वैयक्तीक लाभाचे घटक उदा. वृक्ष लागवड, फळबाग लागवड, पॉली हाऊस, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस/शेड नेट यामध्ये फुलपीके/भाजीपाला लागवड, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, इतर कृषी आधारित उद्योग, गांडुळ खत यूनिट,नाडेप कंम्पोस्ट,सेद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट, शेततळे ,शेततळे अस्तरिकरण, विहिर, ठिबक संच, तुषार संच,पंप संच, पाईपलाईन यासाठी शेतकरी यांना अनुदान मिळते.

तसेच भूमीहीन कुटुंबातील व्यक्ती,विधवा,परित्यक्ता महिला, घटस्फोटीत महिला, अनुसूचित जाती / जमाती मधिल महिला शेतकरी याना बंदिस्त शेळीपालन व कुक्कुट पालन या घटकां चा लाभ मिळतो.

तसेच हवामान अनुकूल वाणांचे बिजोत्पादन, बियाणे प्रक्रिया उपकरणे, बियाणे सुकवणी यार्ड, बियाणे साठवण गोदाम यासाठी ही या प्रकल्पांतर्गत अर्थ सहाय्य देण्यात येते.

या प्रकल्पातील गावांमधील अल्प/अत्यल्पभुधारक शेतकरी (2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले) आणि भूमीहीन कुटुंबे यांना वैयक्तीक लाभाच्या बाबीं साठी 75 टक्के अर्थ सहाय्य देण्यात येते. तसेच 2 हेक्टर पेक्षा जास्त परंतू 5 हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी यांना वैयक्तीक लाभाच्या बाबीं साठी 65 टक्के अर्थसहाय्य देण्यात येते.

त्याचप्रमाणे शेतमाल वृद्धिसाठी हवामान अनुकूल उदयोन्मुख मुल्य साखळ्यांचे बळकटी करण अंतर्गत बँका यांनीं मुल्यांकन केलेल्या व्यावसायिक प्रस्ताव, कृषी अवजारे बँक यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गटांना 60 टक्के अर्थ सहाय्य देण्यात येते.

santsahitya.in

Post Views: 471 views

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *