हरभरा लागवड 

हरभरा लागवड 

 

पिकाची माहिती
हरभरा लागवड  कोरडवाहू क्षेत्रामध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिकांपैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये हरभरा या पिकाखाली ३.०१ लाख हेक्टर क्षेत्र तर उत्पादन २.५१ लाख टन होते. हरभऱ्याच्या मुळावरील गाठींमुळे नत्राचे जमिनीतील प्रमाण वाढते. हरभऱ्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे घोडे व इतर जनावरांना खुराक म्हणून हरबरा दिला जातो. मिठाई करण्यासाठी चण्याच्या पिठाचा उपयोग करतात. टरफलासह दाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते १९ % असते. नुसत्या डाळीत २२ ते २५ % असते. हरबऱ्याच्या कोवळ्या पानात मॅलिक व ऑक्झॉंलिक आम्ल असते. हरबऱ्याचे कोवळे शेंडे भाजी म्हणून वापरता.

 

जमिनीचा प्रकार
हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.

 

हवामान
हरभरा लागवडीसाठी कोरडे व थंड हवामान चांगले मानवते. २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर ला पेरणी केल्यास उत्पादन चांगले मिळते. सामू हा ५.५ ते ८.६ असणारी जमीन या पिकासाठी योग्य असते.

 

पिकाची जात
विशाल, विराट, पी.के व्ही-२,पी.के व्ही-४ हे वाण उत्पादन देणारे आहे.

 

लागवड
हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा टोकण पद्धतीने करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व २ रोपातील अंतर १० से मी असावे. प्रति हेक्टरी ६५ ते ७० किलो बियाणे लागते. लागवडीच्या वेळी थायरम २ ग्राम + २ ग्राम बाविस्टीन याची बीजप्रक्रिया करावी व बियाण्याला गुळाचे पाणी हलके चोळावे.

 

खत व्यवस्थापन
हरभरा या पिकाला २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि पालाश खत दयावे. ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी दयावे. पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत २ टक्के यूरियाची फवारणी करावी.

 

पाणी व्यवस्थापन
लागवडीच्या वेळी, फुले येताना व घाटे भरताना पाणी दयावे. पहिले पाणी २० ते २५ दिवसांनी, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे पाणी आणि ६५ ते ७० दिवसांनी दयावे.

 

रोग नियंत्रण
घाटे अळी – या किडीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. उपाय – निमार्क ५ % चे फवारणी करावी.

 

उत्पादन
११० ते १२० दिवसामध्ये हरभरा पीक तयार होते. घाटे कडक वळल्या नंतर मगच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी व ६ ते ७ दिवस उन्हात वाळवावे नंतर कोठीत साठून ठेवावे. सरासरी २५ ते ३० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.

santsahitya.in

Post Views: 1,060 views

कृषी क्रांती चे जिल्हा निहाय WhatsApp Groups

आपल्याच जिल्ह्यालाच जोडले जा.

खात्रीशीर जाहिराती

नवीन जाहिराती

1 thought on “हरभरा लागवड ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *