पाच दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज

हवामन अंदाज

पाच दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज

 

पुणे :  उत्तर महाराष्ट्र ते लक्षद्वीप दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. आजपासून (दि.९) पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

गेल्या तीन ते चार दिवसांपासून अरबी समुद्राच्या पूर्वमध्य, आग्नेय भाग आणि कर्नाटक दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर आणि ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच आंध्र प्रदेश आणि बंगालचा उपसागर या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.

 

उत्तर प्रदेशचा ईशान्य परिसर ते पश्चिम राजस्थान दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र असून ते समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी (दि.१०) मराठवाडा, विदर्भातात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, पुणे परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

https://www.santsahitya.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व