या गोष्टी साठी नाबार्ड देतंय ७ लाख रुपयापर्यंतचे कर्ज

या गोष्टी साठी दहा म्हशींच्या गोठ्यासाठी नाबार्ड देतंय ७ लाख रुपयापर्यंतचे कर्ज, ३३ टक्कयापर्यंत सबसिडी

या गोष्टी साठी नाबार्ड देतंय ७ लाख रुपयापर्यंतचे देशातील दूध उत्पादन वाढी साठी केंद्र सरकार नाबार्डच्या मार्फत प्रयन्त करत असून पशुपालन शेतकर्यांना फायदेशीर व्हावे यासाठी विविध योजना आणल्या जात आहेत. आता पशुपालन क्षेत्रात बर्‍याच नवीन वैज्ञानिक पद्धती विकसित झाल्या आहेत, ज्या शेतकर्त्यांसाठी फायद्याचे ठरतात. हे लक्षात घेता सरकारने डेअरी उद्योजक विकास योजना राबविली. डीईडीएस योजना भारत सरकारने 1 सप्टेंबर 2010 पासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, पशुसंवर्धन इच्छिणाऱ्या व्यक्तीला एकूण प्रकल्प खर्चाच्या 33.33 टक्के पर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. या योजनेंतर्गत पशुधन विभाग १० म्हैस खरेदी करण्यासाठी 7 लाखांचे कर्ज नाबार्ड मार्फत देण्यात येत आहे. चालू वर्षी जानेवारी महिन्यामध्ये देशभरामध्ये ६३५ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी नाबार्डच्या संकेत स्थळावर जाऊन कागदपत्राची पूर्णता करून कर्जासाठी फॉर्म भरावेत.या गोष्टी

केंद्र सरकारने खेड्यातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी डेअरी उद्योजक विकास योजना सुरू केली आहे. शासनाने फाईल मंजूर होताच दोन दिवसात अनुदानही दिले जात आहे . सर्वसाधारण प्रवर्गासाठी 25 टक्के तर महिला व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 33 टक्के अनुदान दिले जात आहे.

योजनेंतर्गत कर्ज देणारी संस्था कमर्शियल बँक प्रादेशिक बँक राज्य सहकारी बँक राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक अन्य संस्था जे नाबार्डकडून पुनर्वित्त पात्र आहेत.

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : जर कर्ज 1 लाखाहून अधिक असेल तर कर्जदारास त्याच्या जागेसंबंधित काही कागदपत्र गहाण म्हणून ठेवले जाऊ शकतात. याच बरोबर पुढील कागद पात्रांची या साठी आवश्यकता असेल. १. जातीचे प्रमाणपत्र २. ओळखपत्र व प्रमाणपत्र ३. प्रकल्प व्यवसाय योजनेची प्रत

संबंधित गोष्टींचे नियोजन : उद्योजकाला संपूर्ण प्रकल्प खर्चाच्या किमान 10 टक्के गुंतवणूक स्वत: हून करावी लागेल. याशिवाय कोणत्याही कारणास्तव प्रकल्प 9 महिन्यापूर्वी पूर्ण न झाल्यास प्रकल्प मालकाला अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

या बातमीबद्दल अधिक माहितीसाठी आपण पुढील संकेत स्थळावर भेट द्या  https://www.nabard.org/content.aspx?id=591 .

या योजनेचा लाभ महाराष्ट्रतील दूध पंढरी म्हणल्या जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घेवून दूध उत्पादनात वाढ करण्याचा मान मिळवला आहे. नाबार्ड मार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज आणि सबसिडीची यादी पुढील संकेत स्थळावर उपलब्ध आहे खालील लिंकवर जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२० शेतकऱ्यांची यादी आपल्याला पाहायला भेटेल.

https://www.nabard.org/auth/writereaddata/file/DEDS_-_Details_of_Beneficiaries-%20Jan%202020-%20Without%20Addhar%20Numbers%20for%20web%20site.pdf

Ref:agrowonegram.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *