सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाचा इशारा

हवामन अंदाज

सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाचा इशारा

 

कोरोनाचा कहर सुरुच असतानाच भारतासमोर नवं संकंट आवासून उभं आहे. प्रशांत महासागरामध्ये ला- निना वादळाचा प्रभाव दिसत आहे. त्यामुळे भारतात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कडाक्याची थंडी आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतात २०२० अखेरपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता असून सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

भारतात ला- निना वादळाचा सर्वात जास्त प्रभाव हा दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये यादरम्यान कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. ब्रिटीश शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार १९९४ पासून पृथ्वीच्या पृष्ठभागावरून २८ लाख कोटी टन बर्फ वितळला आहे. जागतिक तापमान वाढ आणि वितळणारा बर्फ याचा परिणाम जमीन आणि समुद्रातील तापमानावर पाहायला मिळत आहे.

 

दरम्यान, ला-निना वादळाचा भारतातील हिवाळ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. साधारणत: ऑक्टोबर महिन्यापासून भारतात थंडी सुरू होते. मात्र, या वर्षी काही बदल होणार आहेत. ला-निना वादळामुळे उत्तर-दक्षिण दिशेने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ज्यामुळे सायबेरियन वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत. याचा परिणाम दक्षिण भारतात होणार असल्याचे सांगितलं जात आहे. हाडे गोठवणारी थंडी तर काही ठिकाणी दवं आणि उंच पर्वत भागात हिमवृष्टी होऊ शकते असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरात मोठ्या प्रमाणात ला-निनाचा प्रभाव दिसून येऊ शकतो. यामुळे सप्टेंबर महिन्यात भारतात मुसळधार तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. वर्षा अखेरपर्यंत मान्सून परतेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ref:- agrowonegram.com

https://www.santsahitya.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व