KCC; किसान क्रेडिट कार्ड धारकांना एक लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर

KCC; किसान क्रेडिट कार्ड धारकांना एक लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर

 
 
शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत व्हावी यासाठी सरकार शेतकऱ्यांना किसान कार्डची सुविधा पुरवते.
 
या योजनेचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. सध्या देशात कोरोनाचे संकटात शेतकऱ्यांना केसीसी मार्फत १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज मंजूर झाले आहे.
 
याविषयीची माहिती वित्त मंत्रालयाने दिली आहे. बँकांनी एक लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचे सांगितले आहे.
 
मंत्रालयाच्या मते, १७ ऑगस्टपर्यंत *१.२२ कोटी किसान क्रेडिट कार्ड* देण्यात आले आहेत. याची कर्जाची मर्यादा ही *१,०२,०६५ कोटी रुपये आहे.
 
यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात वृद्धी आणण्यास याची सहाय्यता होईल.
 
साधरण १.१ कोटी किसान क्रेडिट धारकांना २४ जुलैपर्यंत ८९ , ८१० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते.
 
एका महिन्यात १२,२५५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. सध्याच्या संकटात कृषी क्षेत्राला दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या मार्फत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध देण्यासाठी विशेष अभियान चालविले जाणार असल्याचे घोषणा करण्यात आली होती.
 
दरम्यान केसीसीमार्फत डेअरीचा व्यवसाय करणाऱ्या आणि मासेमारी, मत्स्य शेती* करणाऱ्यांनाही कर्ज देण्यात येणार असून साधरण २.५ कोटी शेकतऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.
 
किसान क्रेडिट कार्डसाठी असे करा अर्ज
 
किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आपण पीएम किसान या संकेतस्थळाचा उपयोग करु शकतात.
 
pmkisan.gov.in येथून आपण किसान क्रेडिट कार्डचा फार्म डाऊनलोड करु शकतात.
 
या फार्मसह आपल्या जमिनीचीचे कागदपत्रे, पीकांची माहिती द्यावी लागेल.
 
याशिवाय आपण इतर बँकेतून किसान क्रेडिट कार्ड घेतले आहे का याची माहितीही आपल्या द्यावी लागेल. अर्जात सर्व माहिती भरल्यानंतर बँकेत हा जमा करावा. KCC; किसान क्रेडिट
ref:- marathi.krishijagran.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व