खुशखबर कांदा चाळीसाठी ६० कोटींना मंजुरी !

खुशखबर कांदा चाळीसाठी ६० कोटींना मंजुरी

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत २०१९-२० मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेल्या कांदाचाळ योजनेसाठीच्या ६० कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांतील ६५०० हून अधिक कांदाचाळधारक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. २७ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदाचाळ उभारणी प्रकल्प २०१९-२० मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.खुशखबर कांदा

या प्रकल्पांतर्गत एकूण १५० कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. समितीच्या मंजुरीनंतर या योजनेसाठीच्या अर्थसाहाय्य स्वरूपात ६० कोटी रुपयांचा निधी एक वर्षाच्या कलावधीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर प्रकल्प ५०:५० याप्रमाणात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या निकषांनुसार अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ६७८९ लाभार्थ्यांना ६० कोटी रुपयांचा निधी ‘आरकेव्हीवाय’मधून मंजूर करण्यात आला.खुशखबर कांदा

प्रकल्पातील महत्वाच्या बाबी

●मंजूर निधीपैकी केंद्र शासनाचा हिस्सा ६० टक्के व राज्य शासनाचा हिस्सा ४० टक्के असेल.
●निवडलेल्या लाभार्थ्यांना सक्षम अधिकारी यांनी पूर्वसंमती दिल्यानंतरच अनुदान मिळेल.
●लाभार्थ्याच्या सातबाऱ्यावर नोंद झाल्याशिवाय अनुदान मिळणार नाही.
●लाभार्थ्याच्या कांदाचाळीचे जिओ टॅगिंग, आधार संलग्न बँक खाते आवश्‍यक आहे

 ref:-hoyamhishetkari.com 

कांदा चाळ योजना लाभार्थी आणि निधी (लाख रुपये) (२०१९-२०)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *